पाक क्रिकेट म्हणाला, सेहवागच्या त्रिशतकापेक्षा सचिनचे ते शतक भारीच

सुशांत जाधव
Saturday, 11 July 2020

एका यू-ट्यूब शोमध्ये  सकलेन मुश्ताकने भारताच्या माजी आणि दिग्गज फलंदाजांच्या खास इनिंगसदर्भात आपले मत व्यक्त केले.

मुंबई : पाकिस्तानचा माजी फिरकीपटू शकलेन मुश्ताकने सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी पाकिस्तान विरुद्ध केलेल्या शतकाची तुलना केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 1999 मध्ये चेन्नईच्या मैदानात खेळलेली शतकी इनिंग ही विरेंद्र सेहवागने मुल्तानच्या मैदानात लागवलेल्या त्रिशतकापेक्षाही भारी होती, असे शकलेनने म्हटले आहे. सेहवाची मुल्तानमधील  खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल होती. एवढेच नाही तर पाकिस्तानी संघ ताकदिनीशी उतरला नव्हता असेही शकलेनने म्हटलंय. सेहवाग सचिनच्या खेळीसंदर्भात तुलनात्मक मत मांडताना सेहवाग महान फलंदाजांपैकी एक आहे, हे म्हणायलाही शकलेन मुश्ताक विसरला नाही.  

अग...अग... म्हशी...अशी का झाली पाक मंडळाची अवस्था ?

एका यू-ट्यूब शोमध्ये  सकलेन मुश्ताकने भारताच्या माजी आणि दिग्गज खेळाडूंच्या खास इनिंगसदर्भात आपले मत व्यक्त केले.  सेहवागच्या त्रिशतकी खेळीबद्दल शकलेन म्हणाला की, सेहवाग खूप नशीबवान होता. त्यावेळी खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल दिसत होती. खूप साऱ्या गोष्टी सेहवागच्या बाजूने होत्या. माझ्यासह शोएब अख्तर दुखापतग्रस्त होता. त्यामुळे गोलंदाजीत म्हणावी तितकी धार नव्हती, असेही त्याने सांगितले. तो पुढे म्हणाला की, सेहवाग स्फोटक फलंदाज आहे पण त्याच्या त्रिशतकी खेळी पेक्षा मला सचिन तेंडुलकरने चेन्नईच्या मैदानात खेळलेली शतकी  खेळी खूप उत्तम होती, असे वाटते. सचिन तेंडुलकरने चेन्नई कसोटीतील दुसऱ्या डावात 130 धावांची खेळी केली होती. यावेळी आम्ही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलो होतो. संघर्षमय सामन्यात सचिनने शतकी खेळी केली होती, असेही शकलेनने यावेळी सांगितले.  

किंग खाननं गंभीरला दिलेली मुभा दादाला दिली नव्हती

मुल्तान कसोटीमध्ये सेहवागने त्रिशतकी खेळी केली होती. या खेळीसह भारताकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो पहिला फलंदाजही ठरला होता. विशेष म्हणजे सेहवागने आपल्या या शतकामागे सचिन तेंडुलकरचा सल्ला महत्त्वाचा होता, असेही म्हटले होते. सचिन तेंडुलकर दुसऱ्या बाजूला असल्यामुळे ऐतिहासिक खेळी शक्य झाली, अशी प्रतिक्रिया सेहवागने या ऐतिहासिक खेळीनंतर दिली होती. 


​ ​

संबंधित बातम्या