तो काळ होता सचिनचा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

त्या काळात सचिन मैदानात पाय ठेवताच, त्याच्या नावाचा जल्लोष सुरू व्हायचा. सचिन... सचिन... या आवाजाने प्रेक्षक मैदान डोक्यावर घेत होते.

वयाच्या १६ व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरूवात करून अल्पावधीतच क्रिकेट जगतात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आज आपला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. हे सारं सचिनने स्वकष्टाने कमाविले असले तरी तो याचे श्रेय नेहमीच प्रेषकांनाच देतो. आताही त्याने प्रेक्षकांविना क्रिकेट सामने खेळविण्याचा पर्याय निराशाजनक असल्याचे मत व्यक्त केले.

त्या काळात सचिन मैदानात पाय ठेवताच, त्याच्या नावाचा जल्लोष सुरू व्हायचा. सचिन... सचिन... या आवाजाने प्रेक्षक मैदान डोक्यावर घेत होते. परंतु, सध्या कोरोनामुळे प्रेषकांविना आयपिएल खेळविण्याचा पर्याय काहीजण सुचवत आहेत. मात्र, सचिनला हा पर्याय मुळीच आवडला नाही. याबाबत बोलताना सचिन म्हणाला, स्पर्धेसाठी उतरणाऱ्या खेळाडूंना मैदानात प्रेक्षक नसल्याने निराश नक्की वाटणार आहे. असे अनेक वेळा घडले आहे, की प्रेक्षकांना खेळाडूंकडून योग्य तो प्रतिसाद मिळतो. काही वेळा प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खेळावे लागते. मी जर एखादा चांगला फटका मारला, तर मैदानातील प्रेक्षक जल्लोष करतात. हा जल्लोष फलंदाजाला एक वेगळीच ऊर्मी देऊन जातो. त्याचबरोबर एखादा गोलंदाज भेदक मारा करीत असेल, तर त्यालाही स्टेडियममधील प्रेक्षकांकडून असाच प्रतिसाद मिळतो. तेव्हा फलंदाजावरही दबाव निर्माण होतो. अशा स्थितीत फलंदाजाला आपल्या खेळाने प्रेक्षकांना प्रत्युत्तर देणे भाग असते.

दिग्गज खेळाडूच्या बायकोनेच पसरविली करोनाविषयी चुकीची माहिती

प्रेक्षकही खेळाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचे प्रोत्साहन आणि आपल्या विरोधाबाजूने किंवा आपल्या विरोधात बोलण्याचा त्यांचा आवाज म्हणजे खेळातील गरज आहे. कोरोनाच्या सावटानंतरच्या क्रिकेटबाबत बोलताना सचिन म्हणाला चेंडूला चकाकी आणताना खेळाडूंना नक्कीच चिंता वाटेल. या विषाणूबद्दल सातत्याने त्यांच्या डोक्यात विचार सुरू असतील. जोपर्यंत हा विषाणू आपल्या आजूबाजुला असेल, तोपर्यंत सामाजिक वावरचा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. एकमेकांना टाळ्या देणे, मिठी मारणे, हस्तांदोलन करणे आता काही काळासाठी टाळावे लागणार आहे.

आधी सुरक्षितता महत्त्वाची

करोनामुळे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचबरोबर टी-२० वर्ल्ड कपवरही या विषाणूचे सावट असणार आहे. वर्ल्ड कप पुढे ढकलून त्या दरम्यान आयपीएल घ्यावी, असा प्रस्तावही पुढे येत आहे. याबाबत सचिन म्हणाला, की याबाबत मी तरी फार विचार करण्याची गरज नाही. त्यामुळे वर्ल्ड कप होईल, की आयपीएल हे मी सांगू शकत नाही. सध्या तरी या विषाणूवर मात करणे, हे एकच उद्दीष्ट आहे. त्यानंतर अनेक गोष्टींवर चर्चा करता येईल. कारण, खेळाडूंची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आयपीएल ऑक्टोबरमध्ये घ्यावी की नाही, याबाबत सरकार आणि बीसीसीआय नक्कीच विचार करतील.

 


​ ​

संबंधित बातम्या