सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस लक्ष्मणचं काय होणार? सोमवारी कळेल!

वृत्तसंस्था
Wednesday, 15 May 2019

मुंबई : परस्पर हितसंबंध नियमाचा भंग केल्याच्या आरोपाबद्दल भारतीय मंडळाचे लोकपाल डी. के. जैन यांच्यासमोर सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची चार तास सुनावणी झाली, पण तरीही याबाबतचा निर्णय झाला नाही.

याबाबतची सुनावणी 20 मे रोजी पुन्हा होईल, असे सचिनचे वकील अमित सिबल यांनी सांगितले. पुढील सुनावणीस सचिन आणि लक्ष्मणने व्यक्तीशः उपस्थित राहण्याची गरज नाही. आवश्‍यकता भासल्यास त्यांना बोलावण्यात येईल, असे जैन यांनी सांगितल्याचे समजते. आजच्या चौकशीसाठी तेंडुलकर तसेच लक्ष्मणविरुद्ध तक्रार केलेले मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे संजीव गुप्ता, तसेच भारतीय मंडळाचे सीईओ राहुल जोहरी यांनाही समन्स बजावण्यात आले होते; पण त्यांच्या उपस्थितीबाबत अथवा चौकशीबाबत काहीही कळले नाही. 
 
संबंधित बातम्या