सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मणचं काय होणार? सोमवारी कळेल!

वृत्तसंस्था
Wednesday, 15 May 2019

सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या दिग्गज क्रिकेटपटूंविरुद्ध परस्परविरोधी हितसंबंधांच्या तक्रारीबाबत लोकपाल न्या. डी. के. जैन 20 मे रोजी पुढील सुनावणी घेतील. आज दोघे व्यक्तिशः उपस्थित राहिले; पण सुनावणीतून निर्णय होऊ शकला नाही.

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या दिग्गज क्रिकेटपटूंविरुद्ध परस्परविरोधी हितसंबंधांच्या तक्रारीबाबत लोकपाल न्या. डी. के. जैन 20 मे रोजी पुढील सुनावणी घेतील. आज दोघे व्यक्तिशः उपस्थित राहिले; पण सुनावणीतून निर्णय होऊ शकला नाही.

20 तारखेला त्यांना व्यक्तिशः उपस्थित राहण्याची गरज नाही; पण इच्छा असल्यास ते येऊ शकतात. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी तक्रार केली आहे.

आयपीएल फ्रॅंचायजीमधील पद आणि क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य अशी दोन्ही परस्परविरोधी हितसंबंध असल्याचा त्यांचा दावा आहे. सचिनचे वकील अमित सिब्बल यांनी सांगितले की, मी सचिनचे प्रतिनिधित्व केले. सुनावणी चार तास चालली; पण त्यातून निर्णय होऊ शकला नाही.'

आयपीएल असो वा वर्ल्ड कप.. प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्लिक करा!
 


​ ​

संबंधित बातम्या