सचिन, लारा पुन्हा मैदानात; खेळणार ट्वेंटी20 सामना

वृत्तसंस्था
Wednesday, 16 October 2019

सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह निवृत्त झालेल्या माजी क्रिकेपटूंची ट्‌वेन्टी-20 मधली आक्रमकता पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना पहायला मिळणार आहे. निमित्त आहे, रस्ते सुरक्षा जागतिक टी-20 सिरीज. पुढील वर्षात ही स्पर्धा सुरू होईल आणि दरवर्षी होणार आहे.

मुंबई - सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह निवृत्त झालेल्या माजी क्रिकेपटूंची ट्‌वेन्टी-20 मधली आक्रमकता पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना पहायला मिळणार आहे. निमित्त आहे, रस्ते सुरक्षा जागतिक टी-20 सिरीज. पुढील वर्षात ही स्पर्धा सुरू होईल आणि दरवर्षी होणार आहे. 

संपूर्ण देशभरात 2 ते 16 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. परदेशी खेळाडूंमध्ये ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशान, जॉन्टी ऱ्होडस्‌ अशा खेळाडूंचा समावेश असेल. 

46 वर्षीय सचिन तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा विक्रमवीर फलंदाज आहे. 34 हजारांहून अधिक धावा, 100 शतके अशी देदीप्यमान कामगिरी करणारा सचिन 2013 मध्ये दोनशेवा कसोटी सामना खेळून निवृत्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अमेरिकेत एक ट्‌वेन्टी-20 प्रदर्शनीय लीग झाली होती. त्यात शेन वॉर्न, लारासह काही माजी निवृत्त खेळाडूंचा समावेश होता.


​ ​

संबंधित बातम्या