#NationalSportsDay सचिनला मेजर ध्यानचंद यांची आठवण

वृत्तसंस्था
Wednesday, 29 August 2018

हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेले मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त आज (ता. 29) क्रीडादिन साजरा केला जात असताना, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांनेही मेजर ध्यानचंद यांची आठवण काढली आहे.

मुंबई : हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेले मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त आज (ता. 29) क्रीडादिन साजरा केला जात असताना, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांनेही मेजर ध्यानचंद यांची आठवण काढली आहे.

सचिनने ट्विटरद्वारे ध्यानचंद यांना आदरांजली वाहताना म्हटले आहे, की चंद्राच्या प्रकाशात मेजर ध्यानचंद सराव करत असे असे मी ऐकले आहे. त्यावेळी लाईटची सोय नव्हती. त्यांनी आपली स्वप्ने कशी पूर्ण केली आहेत ही आपल्याला माहित आहेच. यालाच खरे खेळाबद्दल असलेले समर्पण म्हणतात. त्यांच्या 113 व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना आदरांजली वाहतो.

देशात सध्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडूनही मोठी पावले उचलली गेली आहेत. सचिननेही खेळ भावना जागृत होण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सचिनने स्पोर्टस प्लेइंग इंडिया म्हणूनही उल्लेख केला आहे.


​ ​

संबंधित बातम्या