आयएसएलपासून सचिन तेंडुलकर दूर

वृत्तसंस्था
Monday, 17 September 2018

कोची : इंडियन सुपर लीगमधील केरळा ब्लास्टर्स या क्‍लबची आपली सहमालकी विकण्याचा निर्णय सचिन तेंडुलकरने घेतला आहे. आयएसएलमध्ये 2014 पासून हा क्‍लब आहे, तेव्हापासून सचिन त्याचा सहमालक होता. 

कोची : इंडियन सुपर लीगमधील केरळा ब्लास्टर्स या क्‍लबची आपली सहमालकी विकण्याचा निर्णय सचिन तेंडुलकरने घेतला आहे. आयएसएलमध्ये 2014 पासून हा क्‍लब आहे, तेव्हापासून सचिन त्याचा सहमालक होता. 

उद्योगपती निम्मागाडा प्रसाद, निर्माते अल्लू अर्जुन; तसेच नागार्जुना आणि चिरंजीवी यांच्यासह सचिन केरळा ब्लास्टर्सचा सहमालक होता. क्‍लब पाचव्या वर्षात प्रवेश करीत आहे. या वेळी आगामी पाच वर्षांची योजना तयार करणे आवश्‍यक असते. त्याचबरोबर यात माझा सहभाग काय असेल, याचाही विचार करण्याची गरज होती. सर्वंकष विचारानंतर मी केरळा ब्लास्टर्सबरोबरील सहप्रवर्तक असलेले नाते संपवण्याचे ठरवले आहे, असे सचिनने पत्रकात म्हटले आहे. सचिनचा यातील सहभाग अब्जाधीश उद्योगपती खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. हायपरमार्केट, तसेच शॉपिंग मॉल्समध्ये त्यांची मालकी असल्याची चर्चा आहे. 

सचिनचा या फ्रॅंचाइजमधील नेमका सहभाग किती होता, त्यावरून मतभिन्नता आहे; पण तो सुरवातीस 20 टक्के होता, असे सांगितले जात आहे. त्याने उद्योगपती प्रसाद व्ही. पोतलुरी यांच्यासह 2014 मध्ये या क्‍लबची मालकी मिळवली होती. एका वर्षातच पोतलुरी तसेच त्यांच्या पीव्हीपी व्हेंचर्सने त्यांच्याकडील 40 टक्के मालकी सचिनला दिली होती. एका वर्षाने प्रसाद तसेच दाक्षिणात्य अभिनेते सचिनसह सहमालक झाले. त्या करारानंतरही सचिनकडे 20 टक्केच मालकी होती, अशी चर्चा आहे.  

 
 

संबंधित बातम्या