सचिन-कोहलीच्या शतकांचा जुळून आला असा योगायोग

वृत्तसंस्था
Tuesday, 21 August 2018

भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 58वे शतक झळकावले. त्याने भारताच्या दुसऱ्या डावात 103 धावा केल्या. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरनेही त्याच्या 58व्या शतकात 103 धावा केल्या होत्या.  

नॉटिंगहम : भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 58वे शतक झळकावले. त्याने भारताच्या दुसऱ्या डावात 103 धावा केल्या. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरनेही त्याच्या 58व्या शतकात 103 धावा केल्या होत्या.  

सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या जुळून आलेल्या या योगयोगाबद्दल सोशलमीडियावर सध्या बरीच चर्चा रंगत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात विराट कोहलीचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले होते. त्याची कसर दुसऱ्या डावात भरुन काढत कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 58वे शतक झळकावले. विशेष बाब म्हणजे 2001मध्ये सचिन तेंडुलकरनेही इंग्लंडविरुद्धच आपले 58वे शतक साजरे केले होते, आणि त्यावेळी त्यानेही 103 धावा केल्या होत्या.     

कोहलीने 197 चेंडूमध्ये 10 चोकारांसह 103 धावा ठोकल्या. ख्रिस वोक्सने त्याला पायचीत करत बाद केले. इंग्लंडने दिवसाअखेर एकही फलंदाज न गमवता 23 धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी 521 धावांची गरज आहे. 
 

संबंधित बातम्या