अॅथलीट्स व्हिलेजमध्ये डंबशायरची भन्नाट मज्जा

ऋतुजा भोसले
Monday, 20 August 2018

मी कारकिर्दीत प्रमथच देशासाठी मल्टीस्पोर्टस इव्हेंटमध्ये खेळण्याचा आनंद मी लुटते आहे. मी आणि अंकिता रैना रुम पार्टनर आहोत. पुण्यात आम्ही पीवायसी हिंदू जिमखान्यावर एकत्र सराव करतो. आमची चांगली मैत्री आहे. सराव वगळता एरवी एकत्र आल्यानंतर मात्र आम्ही टेनिसविषयी जास्त बोलत नाही. कुणी कोणते नवे पुस्तक वाचले असेल तर त्याची माहिती एकमेकींना देतो. स्पर्धेच्या ठिकाणी नवे रेस्टॉरंट कळले तर तिथे जातो. रुममध्ये मी शनिवारी रसेल पीटर्सचा कॉमेडी शो पाहिला. कॉमेडी शो पाहायची सुद्धा आम्हाला आवड आहे.

रविवारी जाकार्तामध्ये स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. आम्ही पलेमबांगला असल्यामुळे तो मिस केला. भोजन घेतल्यानंतर आम्ही पुरुष-महिला संघांमधील खेळाडू अॅथलीट्स व्हिलेजमधील कॉरीडॉरमध्ये एकत्र आलो. यावेळीही अजेंडा टेनिसचा नव्हता. कुठला असेल बरे, जरा डोके खाजवा...

डंबशायर.. तर हे डंबशायर खेळताना भन्नाट मज्जा आली. रामकुमार रामनाथन, रोहन बोपण्णा, असे सारेच सहभागी झाले होते. यात कोण जिंकले असा प्रश्न मात्र विचारू नका, कारण या बाबतीत आम्ही सारेच एका माळेचे मणी निघालो. सिनेमाचे नाव माहित असेल तर अॅक्टिंग करता येत नव्हती आणि अॅक्टींग जमली तर आमच्या पार्टनरना सिनेमाचे नाव काही केल्या कळत नव्हते. असो, पण एकूण मजा खूप आली. अर्थात पण आम्ही अर्ध्या तासात ब्रेक घेतला आणि झोपी गेलो.

रविवारी सकाळी सात वाजता आम्ही प्रॅक्टीससाठी कोर्टचे बुकिंग केले होते. मी आणि प्रांजला साडेसहा वाजता निघालो. आधी आम्ही दोघींनी सराव केला. त्यानंतर रामकुमार आणि रिया भाटिया यांच्याबरोबरही आम्ही खेळलो. रामकुमारची सेकंड सर्व्ह सुद्धा आम्हाला भारी ठरत होती. सारे चेंडू डोक्यावरून जात होते.

सरावानंतर आम्ही अॅथलीट्स व्हिलेजमध्ये परतलो. उद्घाटन सोहळ्याचे काही फोटो मी इन्स्टाग्रामवर पाहिले. हा सोहळा अगदी कुल झाल्यामुळे तो मिस केल्याचे वाईट वाटले, पण माझे लक्ष खेळावर आहे. सोमवारी मी आणि प्रांजला याडलापल्ली दुहेरीचा पहिला साना खेळणार आहोत. त्यासाठी आम्ही कसून तयारी करीत आहोत.

संबंधित बातम्या