विश्वविक्रमी रशियन सुंदरीचा हा व्हिडिओ एकदा पाहाच!

सुशांत जाधव
Wednesday, 29 July 2020

ऑलिम्पिकमध्ये महिला पोल व्हॉल्ट प्रकारात सातत्यपूर्ण दोन सुवर्ण पदक मिळवणाऱ्या रशियन येलेना इसिनबायेव्हाना हिने 2013 मध्ये निवृत्ती जाहीर केली.

ऑलिम्पिकमध्ये महिला पोल व्हॉल्ट प्रकारात सातत्यपूर्ण दोन सुवर्ण पदक मिळवणाऱ्या रशियन येलेना इसिनबायेव्हाना हिने 2013 मध्ये निवृत्ती जाहीर केली. या खेळ प्रकारातील 5.06 मीटरचा विश्विविक्रम हा तिच्याच नावे आहे. 2009 च्या ऑगस्टमध्ये ज्यूरिखमधील स्पर्धेत येलेना इसिनबायेव्हानाने 5. मीटरचा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. 2004 अॅथेन्स आणि 2008 मध्ये बिजिंगमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. महिलांच्या व्हॉल्टमध्ये तिच्या नावे जवळपास 28 विश्वविक्रमाची नोंद आहे. मास्कोतील जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतून तिने खेळाला अलविदा केले होते.

#आठवतेय_का? : IPL मध्ये हिटमॅननं MI विरुद्धच केली होती हॅटट्रिकची कमाल! 

ऑलिम्पिकमधील पहिल्या सुवर्ण पदकावेळीच्या सुवर्ण कामगिरीचा  तिचा व्हिडिओ पाहत राहावे असाच आहे. खेळाच्या मैदानात बऱ्याचदा प्रतिस्पर्धी खेळाडूवर पुटपुटणारे आणि स्लेजिंग करणारा प्रकार तुम्ही अनेकदा पाहिला असेल. पण तोंडातल्या तोंडात विजयाचा मंत्र जपत विजयाची तपस्या करणारी रशियन येलेना इसिनबायेव्हाना ही पहिली खेळाडू असेल. मिळालेल्या संधीच सोन करायचय हे मनात ठाम ठरवून शेवटच्या क्षणापर्यंत ती स्वत:ला समजावताना दिसते. विजय पक्का झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर फुलले हसू  प्रेरणादायी प्रवास कसा निश्चित  करायचा असतो, याचे उदाहरण देऊन जाणारा असाच आहे.

ICC Test WC : पाकची धुलाई केली तरी भारताची बरोबरी करणं इंग्लंडला जमणार नाही​

ऑलिम्पिकमधील लक्षवेधी कामगिरीशिवाय तिने पाचवेळा तिने विश्व चॅम्पियनशीप स्पर्धा गाजवली आहे.  कामगिरीचा थक्क करणारा आलेख तिला महान पोल व्हॉल्टमधील खेळाडूंच्या यादीत नेऊन बसवतो. 2009 आणि 2010 मधील विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेतील अपयशानंतर तिने तब्बल एक वर्ष विश्रांती घेतली. 
 


​ ​

संबंधित बातम्या