'संपूर्ण समाज एकजूट होत नाही तोपर्यंत मैदानातील हा प्रकार थांबणार नाही'

टीम ई-सकाळ
Tuesday, 9 June 2020

वर्णभेदाविरुद्धच्या या लढाईस जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे. क्रीडा क्षेत्रासहित सर्वांनीच आपली भूमिका मांडत वर्णभेदाविरुद्ध दंड थोपटले आहेत.

मुंबई : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूनंतर वर्णभेदाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. अनेक क्षेत्रातील लोकांनी पुढे येत वर्णभेदाविरुद्ध निषेध करत आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी आपले वैयक्तिक वर्णभेदासंबंधित अनुभव कथन करत आपल्या मनाला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला. समाज जोपर्यंत एकत्र येऊन वर्णभेदाविरुद्धच्या समस्येवर लढणार नाही तोपर्यंत खेळातील वर्णभेदाविरुद्धचा नियम घशाच्या आजारावर वरून केलेली मलमपट्टी ठरेल, असे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग यांनी म्हटले आहे.           

#वर्णभेदाचा_खेळ : तिच्या उदरातील बाळावरही झाली होती विकृत टिपण्णी

जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा अमेरिकेतील मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेत वर्णभेदाचा मुद्दा उपस्थित होऊन सर्व देशभरात वर्णभेदाविरुद्धच्या आंदोलनास सुरवात झाली. वर्णभेदाविरुद्धच्या या लढाईस जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे. क्रीडा क्षेत्रासहित सर्वांनीच आपली भूमिका मांडत वर्णभेदाविरुद्ध दंड थोपटले आहेत. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग यांनी वर्णभेदाविरुद्ध प्रतिक्रिया देताना समाज जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत ही मानसिकता ठेचता येणार नाही, असे म्हटले आह. यासंदर्भात मायकेल होल्डिंग म्हणाले की,  खेळातील कठोर नियम पाळल्याने वर्णभेद रोखता येत नाही.  क्रिकेट, फुटबॉल आणि अनेक मैदानावर वर्णभेदाचा सामना करावा लागतो. हा थेट सामना समाजाशी आहे. त्यामुळे खेळाडू हे समाजातूनच येत असल्यामुळे खेळातील वर्णभेदाविरुद्ध न लढता संपूर्ण समाजविरुद्धच लढणे आवश्यक आहे. आणि याची जाणीव समाजास होणे गरजेचे आहे.

'चेंडू चमकवण्यासाठी कृत्रिम पदार्थ वापरण्याऐवजी हा प्रयोग करता येईल'

मायकेल होल्डिंग यांनी वेस्ट इंडिजचे सहक्रीडापटू डॅरेन सॅमी आणि ख्रिस गेल यांच्या वर्णद्वेषाविरूद्धच्या मतास सहमती दर्शवत जगभरातील 'ब्लॅक लाईव्हज मॅटर' अभियानाचे समर्थन केले. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याने काही दिवसांपूर्वीच इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळत असताना स्वतःला आणि श्रीलंकन क्रिकेटपटू थिसारा परेराला वर्णभेदाचा सामना करावा लागल्याचे म्हटले होते. यासोबतच ख्रिस गेलने देखील वर्णभेदाच्या मुद्दयावर प्रतिक्रिया दिली होती. फुटबॉलप्रमाणेच क्रिकेटच्या मैदानातही वर्णभेद आहे, असे तो म्हणाला होता.  


​ ​

संबंधित बातम्या