भारताला विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती

वृत्तसंस्था
Wednesday, 5 September 2018

भारताला 2007 मध्ये ट्वेंटी-20 विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या भारतीय संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू जलदगती गोलंदाज आर. पी. सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

नवी दिल्ली : भारताला 2007 मध्ये ट्वेंटी-20 विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या भारतीय संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू जलदगती गोलंदाज आर. पी. सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेली 13 वर्षे खेळत असलेल्या 32 वर्षीय आर. पी. सिंहची डावखुरा वेगवान गोलंदाज अशी होती. त्याने 14 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 10 ट्वेंटी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने 2011 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये विश्वकरंडक जिंकला होता. त्या संघाचा आर. पी. सिंह सदस्य होता.

ट्विटरवरून त्याने आपली निवृत्ती जाहिर करताना म्हटले आहे, की 13 वर्षांपूर्वी 4 सप्टेंबर 2005 मध्ये मी सर्वांत पहिल्यांदा भारताचा ड्रेस परिधान केला होता. आज मी कारकिर्दीची अखेर करण्याचा निर्णय घेत आहे. ज्यांच्यामुळे मी माझी कारकिर्द घडवू शकतो, त्यांचे मी आभार मानतो.


​ ​

संबंधित बातम्या