विराटला कर्णधारपदारून दूर करणार? वाचा कुठे सुरुयेत खलबतं

वृत्तसंस्था
Friday, 20 September 2019

नव्या खेळाडूंचा शोध घेणार 
हेसन यांनी आरसीबी संघात बदल करणार असल्याचे संकेत दिले. भारतातील राष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 अजिंक्‍यपद स्पर्धांवर आम्ही लक्ष ठेवणार आहोत. त्यातून नव्या खेळाडूंचा शोध घेणार आहोत, केवळ त्यांची कामगिरीच नव्हे तर ते दडपणाचा कसा सामना करतात, तंदुरुस्ती हे मुद्देही आम्ही पाहाणार आहोत, असे हेसन यांनी सांगितले. संघात निवड करताना सातत्याला आमचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बंगळूर - टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विक्रमी कामगिरी करत असलेल्या विराट कोहलीला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाच्या नेतृत्वपदी अपयशच आले आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील मोसमात त्याला कर्णधारपदावरून दूर करण्याची चर्चा सुरू झाली असताना संघाचे नवे संचालक माईक हेसन यांनी आरसीबीच्या नेतृत्वबदलाचा प्रश्‍न नाही, असे स्पष्टपणे सांगितले. 

विक्रमवीर विराट कोहली, एबी डिव्हिल्यर्स, ख्रिस गेल असे दादा फलंदाज असतानाही बंगळूर संघाला एकदाही आयपीएल जिंकता आलेली नाही. सात मोसमात कोहलीने बंगळूर संघाचे नेतृत्व केले आहे. 

विराटला कर्णधारपदावरून दूर करण्याचा कोणताच विचार नाही. चुकांपासून बोध घेऊन प्रगती करण्यात विराट नेहमीच अग्रेसर असतो, असे हेसन यांनी सांगितले. संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटीचही असाच विचार करत असल्याचे हेसन म्हणाले. 

नव्या खेळाडूंचा शोध घेणार 
हेसन यांनी आरसीबी संघात बदल करणार असल्याचे संकेत दिले. भारतातील राष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 अजिंक्‍यपद स्पर्धांवर आम्ही लक्ष ठेवणार आहोत. त्यातून नव्या खेळाडूंचा शोध घेणार आहोत, केवळ त्यांची कामगिरीच नव्हे तर ते दडपणाचा कसा सामना करतात, तंदुरुस्ती हे मुद्देही आम्ही पाहाणार आहोत, असे हेसन यांनी सांगितले. संघात निवड करताना सातत्याला आमचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​ ​

संबंधित बातम्या