राष्ट्रीय राईंगपटू निखिलवर चोरट्यांच्या कोयत्याने हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 May 2019

नाशिक : सुवर्णपदक विजेता रोईंगपटू निखिल सोनवणे काल (ता.14) रात्री अकराच्या सुमारास बापू पुल परीसरातील वॉटर एज स्पोर्टस्‌ क्‍लबवर रोईंग खेळाचा सराव करून घरी परतत असतांना लूटमार करणाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. बेदम मारहाण केल्याने निखिल जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान जखमी झाल्याने निखिलला राज्यस्तरीय रोईंग स्पर्धेपासून मुकावे लागण्याची वेळ ओढावली आहे. 

नाशिक : सुवर्णपदक विजेता रोईंगपटू निखिल सोनवणे काल (ता.14) रात्री अकराच्या सुमारास बापू पुल परीसरातील वॉटर एज स्पोर्टस्‌ क्‍लबवर रोईंग खेळाचा सराव करून घरी परतत असतांना लूटमार करणाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. बेदम मारहाण केल्याने निखिल जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान जखमी झाल्याने निखिलला राज्यस्तरीय रोईंग स्पर्धेपासून मुकावे लागण्याची वेळ ओढावली आहे. 

शुक्रवार (ता.17) पासून पुण्यातील नाशिक फाट्याजवळ असलेल्या आर्मी बोटींग क्‍लब येथे राज्यस्तरीय स्पर्धेत निखील सहभागी होणार होता. कसून सराव झालेला असल्याने त्याच्याकडून पदकाचीही अपेक्षा होती. नियमितपणे सराव करतांना स्पर्धेसाठी त्याची तयारी सुरू होती. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्‍त केला जातो आहे. शहरात घरफोट्या, लुटमार सुरू असतांना केवळ पोलिसांकडून मोहिमा राबविण्यात धन्यता मानली जात असल्याची तक्रार यानिमित्त केली जाते आहे. 

कोयत्याने वार करत काढला पळ 
काल (ता.14) रात्री चोपडा लॉन्सजवळ लुटमार करणाऱ्यांनी निखिलवर हल्ला केला. जुना गंगापूर नाका येथून निखिल दुचाकीवरून घराकडे जात होता. यावेळी दोन ते चार हल्लेखोरांनी त्याला रस्त्यात अडविले. त्याच्याकडील रोकड, मोबाईल आदी वस्तू लुटण्यासाठी झटापट सुरू केली. निखीलकडे काही वस्तू न मिळाल्याने हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार करून पळ काढला. हल्ल्यात निखीलला गंभीर दुखापत झाली असून  त्याला देवगावकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

सरावातही पडणार खंड 
चोरट्यांच्या हल्यामुळे निखिलला राज्यस्तरीय रोईंग स्पर्धेपासून मुकावे लागणार आहे. मात्र पूर्णपणे बरे होण्यासाठी विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सरावातही खंड पडणार असून, त्याचा परीणाम पुढील खेळावर होणार असल्याने या घटनेचा संप्ताप क्रीडा प्रेमींकडून व्यक्‍त केला जातो आहे. निखिलने रोईंगमध्ये चांगल्या खेळाचे प्रदर्शन करतांना यापूर्वी एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले आहे.

संशयित ताब्यात; आयुक्‍तांनी घेतली दखल 
याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित दीपक ढवळे (21, रा. मोरे मळा, पंचवटी) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच आज (ता.15) सकाळी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले. तसेच, जखमी निखिलची आई, प्रशिक्षक अंबादास तांबे, विजय बनसोड, क्रीड प्रशिक्षक प्रशांत भाबड यांना पोलीस आयुक्तालयात बोलावून घेत त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. तसेच, ताब्यात घेतलेल्या संशयितांची माहिती देत, पंचवटी पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. 

 या घटनेमुळे दोन दिवसांवर आलेल्या स्पर्धेला मुकलो. या स्पर्धेसाठी मी गेल्या वर्षभरापासून प्रॅक्‍टिस करतो आहे. याच स्पर्धेतील कामगिरीवर मला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होता आले असते. पण, आता वर्षभर मला काहीच करता येणार नाही. पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने सुरवात करावी लागणार आहे. स्पर्धा हुकल्याचे मोठे दु:ख होते आहे. 
- निखिल सोनवणे, रोईंगपटू.

संबंधित बातम्या