Asian Games 2018 : क्‍वाडरपल गटात भारताला सुवर्णपदक

वृत्तसंस्था
Friday, 24 August 2018

इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. रोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटातून भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदक काबीज केले.

पालेमबांग - इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. रोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटातून भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदक काबीज केले. या संघात नाशिकच्या चांदवड तालुक्‍यातील व सध्या लष्कारात असलेल्या रॉईंगपटू दत्तू भोकनळचा समावेश आहे. त्याच्यासमवेत ऑलिंम्पिकपटू सवरण सिंग आणि ओम प्रकाश, सुकमीत सिंग या संघाने शर्यत 6:17:13 अशी वेळ नोंदवत सूवर्णपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे भारताचे पाचवे सुवर्णपदक आहे. 

तसेच भारताच्या दुष्यंत चौधरीने पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात ब्रॉंझपदक पटकावले. त्याने 7:18:76 अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले. या प्रकारात कोरियाच्या खेळाडूने सुवर्ण तर हॉंग कॉंगच्या खेळाडूने रौप्य पदक पटकावले. याशिवाय भारताच्या रोहित कुमार- भगवानसिंह या जोडीनेही लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात ब्रॉंझ पदक पटकावले.


​ ​

संबंधित बातम्या