100 टेस्ट, 100 वाईन बाटल्या! याची मजा आहे राव

वृत्तसंस्था
Friday, 21 February 2020

कसोटी क्रिकेटमध्ये शंभर सामने पूर्ण केल्याबद्दल आज त्याला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून भेट म्हणून शंभर वाईनच्या बाटल्या भेट म्हणून देण्यात आल्या. 

वेलिंग्टन : शंभर कसोटी, शंभर टी20 आणि शंभर एकदिवसीय सामने असा अद्भुत विक्रम आज न्यूझीलंडचा मितभाषी फलंदाज रॉस टेलरच्या नावावर झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज सुरु झालेला कसोटी सामना हा रॉस टेलरचा शंभरावा कसोटी सामना आहे. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्वातील पहिला खेळाडू ठरला आहे. 

कर्णधारपद सोडत नाही म्हणून आता त्याला हाकलून लावणार

कसोटी क्रिकेटमध्ये शंभर सामने पूर्ण केल्याबद्दल आज त्याला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून भेट म्हणून शंभर वाईनच्या बाटल्या भेट म्हणून देण्यात आल्या. 

''बापरे! खूप लांबचा प्रवास केला मी. कधीच कल्पना नव्हती मी इतकी वर्ष न्यूझीलंडकरता खेळेन. शाळेतील माझ्या क्रिकेट आणि हॉकीच्या प्रशिक्षकांना मी श्रेय देईन ज्यांनी मला खेळाडू म्हणून सुरुवातीला मार्गदर्शन केले. मी क्रिकेटच्या तीनही प्रकारात 100पेक्षा जास्त सामने खेळू शकलो याचा आनंद वाटतो. आता खेळाडू खूप जास्त प्रमाणात क्रिकेट सामने खेळत आहेत त्याचा विचार करता भविष्यकाळात अजून काही खेळाडू 100 कसोटी सामन्यांच्या क्लबचे सदस्य होतील,'' असे सामन्यापूर्वी रॉस टेलर म्हणाला होता.

पाकिस्तानच्या स्टार फलंदाजाचे निलंबन, कारण वाचाल तर...

क्रिकेटविश्वात एकमेव
सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये शंभर सामने पूर्ण करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. यापूर्वी कोणय्ताही पुरुष किंवा महिला खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. टेलरने नुकतेच भारताविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत आपले टी20 क्रिकेटमधील शंभर सामने पूर्ण केले आहेत. टेलरने न्यूझीलंडसाठी तब्बल 231 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या