रोनाल्डोचं हॉटेल बनलं कोरोनाग्रस्तांचं हॉस्पीटल... खरंय का..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 March 2020

फुटबॉल सामन्यांचं वार्तांकन करणाऱ्या जगभरातील अनेक संकेतस्थळांनी या संदर्भातलं वृत्त दिलं होतं. स्पॅनिश वृत्तपत्र मार्सामध्येही याबद्दलची माहिती होती. मात्र, रोनाल्डोच्या लिस्बनमधील कर्मचाऱ्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. हॉटेलचं रुपांतर हॉस्पिटलमध्ये करण्याबाबत कोणताही विचार झाला नसल्याचं समोर आलेलं आहे. 

फूटबॉलचा विषय निघाला की ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विषय येतोच. त्याला मिळणारे मानधन, त्याची हेअर स्टाईल, त्याच्या मैत्रिणीविषयी क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा केली जाते. मात्र, तो दानशूरही तेवढाच आहे. त्या विषयीही प्रसाममाध्यमांतून बातम्या येत असतात.

कोरोनामुळे संपूर्ण जगभरातच आणीबाणीची स्थिती आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने हे संकट परतवण्यासाठी धडपडत आहे. हे पाहून जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोही पुढे सरसावला आहे. त्याने कोणताही आर्थिक लाभ न पाहता पोर्तुगालमधील आपल्या हॉटेल्सचं रुपांत हॉस्पिटलमध्ये केलं आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांचा खर्चही रोनाल्डो उचलणार आहे. मीडिया आणि सोशल मीडियात त्याच्या या दानशूरपणाबद्दल लिहिलं जातंय.

आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे साडेसहा हजार लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर पोर्तुगालमध्येही बाधित रुग्णांचा आकडाही वाढला आहे.

“आम्ही नेहमीप्रमाणे हॉटेल चालवतोय, हॉटेलचं रुपांतर हॉस्पिटलमध्ये होणार नाहीये. आमच्यासाठी इतर दिवसांप्रमाणेच हा दिवस आहे. अनेक प्रसारमाध्यमांचे आम्हाला फोन आले”.. असं हॉटेल कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान अनेक महत्वाच्या स्पर्धा रद्द झाल्यामुळे रोनाल्डो आपल्या परिवारासोबत वेळ घालवतो आहे.

 

 


​ ​

संबंधित बातम्या