रोनाल्डोने केले रेयाल माद्रिद सोडण्याचे कारण स्पष्ट

वृत्तसंस्था
Tuesday, 17 July 2018

सुखकर जीवन सोडून मी झगडण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हणत रोनाल्डोने रेयाल माद्रिद सोडण्याच्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले. नुकत्याच करारबद्ध झालेल्या युव्हेंटस क्‍लबला पहिले चॅम्पियन्स लीग विजेतेपद मिळवून देण्यास रोनाल्डो प्रयत्नशील असेल.

ट्युरिन : सुखकर जीवन सोडून मी झगडण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हणत रोनाल्डोने रेयाल माद्रिद सोडण्याच्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले. नुकत्याच करारबद्ध झालेल्या युव्हेंटस क्‍लबला पहिले चॅम्पियन्स लीग विजेतेपद मिळवून देण्यास रोनाल्डो प्रयत्नशील असेल.

33 वर्षीय रोनाल्डो हा रेयाल माद्रिदकडून सर्वाधिक (451) गोल करणारा खेळाडू आहे. त्याच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत रेयाल माद्रिदने दोन वेळा 'ला लीगा' स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे तर चार वेळा चॅम्पियन्स लीग विजेतेपद मिळवले आहे. 

 

''मी नेहमी वर्तमानात जगणारा माणूस आहे. मी अजूनही तरुण आहे आणि मला आव्हाने प्रिय आहेत त्यामुळेच मी मँचेस्टरकडून रेयालमध्ये आलो आणि आता युव्हेंटसमध्ये खेळणार आहे. युव्हेंटसमध्ये खेळण्याचा निर्णय मी फार विचारपूर्वक घेतला आहे. हा इटलीमधील सर्वोत्तम क्लब आहे, तसेच याचे मार्गदर्शक आणि व्यवस्थापकही उत्तम आहेत. मी प्रचंड महत्त्वाकांक्षी असून नवीन आव्हाने स्विकारणे मला आवडते. युव्हेंटसकडून खेळण्याची मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.'' असे मत त्याने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मांडले.


​ ​

संबंधित बातम्या