चार महिन्यानंतर रोहितचा वर्कआऊट; वाचा कोठे सुरू केलाय सराव

शैलेश नागवेकर
Thursday, 25 June 2020

मुंबईला कोरोनाचा धोका अधिक आहे त्यामुळे मुंबईत आणि प्रामुख्यान वरळी भागात रहात असलेले रोहित शर्मा,  विराट कोहली, श्रेयस अय्यर हे आंतराष्ट्रीय खेळाडू गेल्या तीन महिन्यांपासून घरातच आहे. आयपीएल कधी होईल तेव्हा होईल पण मुंबई इंडियन्सने घणसोळी येथील आपल्या रिलायन्स मैदानात आजपासून सराव सुरू केला आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची पावले तेथे वळली. 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही निर्बंध हळूहळू खुली होऊ लागली आहे.कोरोनाचा धोका कायम असला तरी सामान्य जनजनजिवनाबरोबर चाकरमान्यांची वर्दळ वाढत आहे. जिमला अद्याप परवानगी नसली तरी खुल्या मैदानांत मात्र कसरती करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा प्रकारे 'आकाश मोकळे' होत असताना भारताचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा घरताच कसा राहिल ?

भारताचे क्रिकेच पुन्हा कधी सुरू होणार याबाबत अद्याप काहीच ठरलेले नाही. आयपीएलबाबत चर्चा होत असली तरी सरावाबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही. देशातील काही भागात जेथे निर्बंध कमी करण्यात आली आहेत किंवा धोका कमी आहे तेथे काही काही खेळाडूंनी सराव सुरू केलेला आहे. चेतेश्वर पुजारा, महम्मद शमी या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आघाडी घेतली आहे.

मुंबईला कोरोनाचा धोका अधिक आहे त्यामुळे मुंबईत आणि प्रामुख्यान वरळी भागात रहात असलेले रोहित शर्मा,  विराट कोहली, श्रेयस अय्यर हे आंतराष्ट्रीय खेळाडू गेल्या तीन महिन्यांपासून घरातच आहे. आयपीएल कधी होईल तेव्हा होईल पण मुंबई इंडियन्सने घणसोळी येथील आपल्या रिलायन्स मैदानात आजपासून सराव सुरू केला आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची पावले तेथे वळली. 

बुधवारीच तो तेथे गेलेला आहे. काल त्याने तंदुरुस्तीसाठी केवळ वर्कआऊटच केला. लॉकडाऊनमघ्ये केवळ घरातच असल्याने सर्वप्रथम वर्कआऊट महत्वाचे आहे. अशातच रोहित शर्मा फेब्रुवारीपासून क्रिकेटपासून दूर आहे. न्यूझीलंड दौऱ्यात त्याची पोटरी दुखावली होती तेथूनच तो मायदेशी परतला होता आणि मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू होताच त्याला तंदुरुस्तीही आजमावता आलेली नाही.आता काही दिवस तो केवळ तंदुरुस्तीसाठी मेहनत घेईल आणि त्यानंतरच नेटमध्ये सराव करेल असा अंदाज आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मात्र कधी वर्कआऊट सुरू करणार याबाबत माहिती मिळालेली नाही.

श्रेयसचाही वर्कआऊट
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरही वरळीतील आदर्श नगर येथे रहातो, आता मैदानातील सरावाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर इमारतीच्या पाठीमागे असलेल्या वरळी स्पोर्टसच्या मैदानात श्रेयस अय्यरनेही वर्कआऊट सुरू केला आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या