INDvsBAN : असं शतक करणारा रोहित उद्या ठरणार पहिला भारतीय

वृत्तसंस्था
Wednesday, 6 November 2019

2007 च्या पहिल्या वहिल्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजेतेपद मिळवले त्या स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध रोहितला पदार्पणाची संधी मिळाली त्यानंतर रोहितचा अश्‍व चौफेर उधलेला आहे.

राजकोट : कसोटी, एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 या तिन्ही प्रकारात शतके करण्याचा मान क्रिकेटविश्‍वात काही ठराविक फलंदाजांनीच मिळवलेला आहे. भारतात तर अवघे दोनच फलंदाज आहेत त्यातीत एक अर्थात रोहित शर्मा! (आणि दुसरा केएल राहुल) शतक आणि रोहित यांचे जवळचे नाते आहे. मग हे शतक केवळ धावांचेच असले पाहिले असे नाही. ते सामने खेळण्याचेही असू शकते. हा हीटमॅन उद्या शंभरावा ट्‌वेन्टी-20 सामना खेळणार आहे. 

संघात स्थान मिळवायचंय? मग ही अट मान्य कर; धोनीला BCCIचा इशारा

कसोटी क्रिकेटमध्ये शंभर सामने खेळणे हे फार मोठे यश मानले जाते. दिग्गज फलंदाज महम्मद अझरुद्दीनचीही गाडी 99 वर अडकलेली आहे. महेंद्रसिंह धोनीलाही शतकी कसोटी खेळता आलेली नाही. आता झटपट क्रिकेटची संख्या वाढत असताना एलिट खेळाडू शतकी सामने खेळण्याची सीमारेषा पार करतात. पण ही मजल मारण्यासाठी सातत्य आणि तंदुरुस्ती तेवढीच महत्वाची असते. या दोन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरलेला आहे. 

Image result for rohit sharma

2007 च्या पहिल्या वहिल्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजेतेपद मिळवले त्या स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध रोहितला पदार्पणाची संधी मिळाली त्यानंतर रोहितचा अश्‍व चौफेर उधलेला आहे. त्या पदार्पणाच्या सामन्यात रोहितला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती पण त्याच्या शंभराव्या सामन्यात तो देशाचे नेतृत्व करणार आहे. पण हे सर्व पावसावर अवलंबून असेल. महा चक्रिवादळाचे सावट रोहितच्या शंभरव्या सामन्यावर असणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या