देशात काय परदेशात काय, 'रो' तो 'हीट' होगा ही!

शैलेश नागवेकर
Wednesday, 2 October 2019

खरे तर रोहित शर्मासारखा फलंदाज आपल्या संघात हवा असे कोणालाही वाटत असेल मात्र त्याचा परिस्थितीनुसार उपयोग करून घेण्याची कल्पकता आणि हुशारी असणे महत्वाचे असते.  रवी शास्त्री यांच्या संघ व्यवस्थापनाने (आता यात विक्रम राठोड यांचा समावेश झाला आहे) रोहितला सलामीवीर म्हणून खेळवण्याचा प्रयोग केला आणि तो सलामीलाच `क्लिक` झाला.

क्रिकेट विश्वासाठी रोहित शर्मा एक कोडे आहे. हे सुटले तर ठीक नाही तर तो भल्या भल्या गोलंदाजांना असे काही कोड्यात टाकतो की त्या सर्व गोलंदाजांची भंबेरी उडत असते. सध्याच्या  एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली नंबर एकचा फलंदाज आहे, पण कदाचीत त्यापेक्षा जास्त दरारा रोहित शर्माचा आहे. त्याची तीन द्विशतके प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवणारी आहेत. अशी कामगिरी अजून कोणालाही करता आलेली नाही, पण पांढऱ्या रंगाच्या चेंडूने खेळले जाणारे आणि लाल चेंडूने खेळले जाणारे क्रिकेट यामध्ये प्रमुख फरक मानसिकतेचा आणि जर फलंदाज असेल तर तो कोणत्या क्रमांकावर खेळतो याचा असतो. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यशस्वी होणारा फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये होईलच असे नाही किंवा सातत्यपूर्ण कामगिरी होईलच असे नाही, म्हणून कसोटी पदार्पणात शतक करणारा रोहित कसोटी संघात आत बाहेर करतच राहिला त्याला आपले स्थान पक्के करता आले नव्हते. 

INDvsSA : सलाम ठोक, सर झुका! रोहित शर्मा रोहित शर्मा

खरे तर रोहित शर्मासारखा फलंदाज आपल्या संघात हवा असे कोणालाही वाटत असेल मात्र त्याचा परिस्थितीनुसार उपयोग करून घेण्याची कल्पकता आणि हुशारी असणे महत्वाचे असते.  रवी शास्त्री यांच्या संघ व्यवस्थापनाने (आता यात विक्रम राठोड यांचा समावेश झाला आहे) रोहितला सलामीवीर म्हणून खेळवण्याचा प्रयोग केला आणि तो सलामीलाच `क्लिक` झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितने शतक केले आणि टीम इंडियाची ताकद वाढवली. 

तंत्रापेक्षा मानसिकता महत्वाची
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणजे अतिशय तंत्रशुद्ध पवित्रा, घोटवून तयार केलेले तंत्र, भक्कम मानसिकता....ही सगळी गुणवत्ता ज्याच्याकडे आहे तोच सलामीवीर म्हणून प्रभाव पाडू शकतो असे म्हटले जाते ते योग्यही आहे. पण असे काही फलंदाज असतात ज्यांची मानसिकता तंत्रापेक्षा मोठी आणि कणखर असते, समोर आलेला चेंडू मग तो पांढऱ्या रंगाचा असो वा लाल रंगाचा त्यांना फरक पडत नाही. वीरेंद्र सेहवाग हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणूनच भारताचे महान फलंदाज आणि सलामीवीर सुनील गावसकर यांना कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणे जमले नाही ते वीरूने दोनदा केले. शेवटी तुम्ही धावा किती केल्या हे महत्वाचे असते.

रोहितला सलामीला का पाठवले ?
रोहितही मधल्या फळीतील फलंदाज पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने जे वीरूला करता आले नाही (तीन द्विशतके) ते रोहितने केलेले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वीरू सलामीला खेळताना. धावांचा वेग वाढायचा आणि गोलंदाजांना कमाल दाखवायला पुरेसा वेळ मिळायचा. आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरु झाली आहे यात अनिर्णित सामना राखणे परडणारे नाही त्यामुळे कसोटी क्रिकेट असले तरी स्ट्राईक रेटचे गणित तेवढेच महत्वाचे ठरणार आहे.  आपल्याकडे चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणे हे फलंदाज डाव उभारणीसाठी काही वेळ घेतात अशा वेळी स्ट्राईक रेटचे संतुलन सांभाळण्यासाठी कोणी तरी वेगात फलंदाजी करणे आवश्यक आहे.  अगोदर मुरली विजय आणि त्यानंतर केएल राहुल अपयशी ठरल्यानंतर सलामीला इतर पर्याय तसापण्यापेक्षा रोहितलाच जर वीरूची जबाबदारी दिली तर ? या विचाराने रोहितचा विचार झाला. काहीही झाले तरी तू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिन्ही कसोटीत खेळणार आहे हा विश्वास  संघ व्यवस्थापानाने त्याला दिला हे सर्वात महत्वाचे आहे.

INDvsSA : रोहितची दणक्यात एन्ट्री; मोडला विराट, पुजाराचा विक्रम 

काय आहे रोहितची खासियत?
प्रत्येकाचा खेळण्याचा पवित्रा वेगवेगळा असतो वीरू पहिल्या चेंडूपासून दे दणादण करायचा तर रोहित जम बसण्यासाठी बऱ्यापैकी वेळ घेतो पण जम बसला तरी त्याची गाडी फेरारीच्या वेगात पळते म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट झपाट्याने वाढतो. आखूड टप्याच्या चेंडूवर तो फ्रंटफूवर हूक किंवा पूल करतो. हे दोन फटके बॅकफूटवर (एक पाऊल मागे जात) असे पुस्तकातले क्रिकेट शिकवते. शिवाय कसोटी क्रिकेटमध्ये उसळत्या चेंडूंचा सर्रास वापर होत असतो अशा परिस्थितीत जर रोहितची भट्टी जमली तर तो कोणालाही नामोहरम करू शकतो. हीच त्याची खासियक आहे.

रोहित परदेशातही यशस्वी होईल ?
भारतातील खेळपट्या आणि परदेशातील प्रामुख्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड येथील खेळपट्या आणि हवामानात फरक आहे. त्यामुळे या देशात खेळताना तंत्र भक्कम असणे महत्वाचे असते असे म्हटले जाते. रोहितच्या बाबतीत म्हणायचे तर तो डावाची सुरुवात करताना उजव्या यष्टीबाहेर स्वींग होणाऱ्या चेंडूवर बाद होतो. पण ही कमकूवत बाजू सर्वांचीच असते. पण समजा तोड फोड करण्याचा इरादा पक्का केला असेल आणि जर समोरच्या गोलंदाविरुद्द दोन-चार खणखणीत चौकार मारले (वीरू असे करायचा) प्रतिहल्ला केला तर समोरचा गोलंदाज हतबल होऊ शकतो थोकड्यात काय तर स्वींग आणि बाऊंस यांचा अंदाज घेतल्यानंतर भक्कम पवित्रा तुम्हाला कोणत्याही खेळपट्टीवर यश देऊ शकतो. त्यामुळे रोहित शर्मा सलामीवीर म्हणून परदेशात यशस्वी होणार नाही असे म्हणणे चुकीचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जो रोहितचा दिवस असतो तेव्हा त्याला रोखणे अश्यक असते...

डॉन को पकडना मुष्कीलही नही ना मुन्किन है..असेच चित्र असते


​ ​

संबंधित बातम्या