रोहितचा पोरकटपणा; विराटला केले अनफॉलो

वृत्तसंस्था
Wednesday, 5 September 2018

काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने ट्विटरवर बीसीसीआयला जाब विचारणारे ट्विट लाईक केल्याने विराट आणि रोहित यांच्यात निर्माण झालेली दरी समोर आली आहे. भारतीय संघ लंडनमध्ये असताना हाय कमिशनला भेट दिल्यावर एका चाहत्याने ट्विट केले. 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने कसोटी संघात स्थान न मिळाल्याने सोशल मीडियाचा आधार घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने नुकतेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर अनफॉलो केले आहे. त्याच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रीया उमटताना दिसत आहेत. 

काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने ट्विटरवर बीसीसीआयला जाब विचारणारे ट्विट लाईक केल्याने विराट आणि रोहित यांच्यात निर्माण झालेली दरी समोर आली आहे. भारतीय संघ लंडनमध्ये असताना हाय कमिशनला भेट दिल्यावर एका चाहत्याने ट्विट केले. 
या ट्विटमध्ये एका चाहत्याने बीसीसीआयला ''अनुष्का शर्माने रोहित शर्माची जागा घेतली आहे का?'' असा जाब विचारला होता. रोहितने हे ट्विट लाईक केले होते. 

इंग्लंड कसोटी मालिकेसाठी जाहिर करण्यात आलेल्या संघात रोहित नाव नव्हते. याबाबतही त्याने ट्विटर नाराजी व्यक्त केली होती. 

​ ​

संबंधित बातम्या