Asia Cup 2018 : रोहितने लगावला 'विरास्त्री' जोडीला अप्रत्यक्ष टोला

वृत्तसंस्था
Tuesday, 18 September 2018

दुबई :  आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघ  मधल्या फळीत प्रयोग करण्याची शक्यता असून पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडकासाठी संघबांधणीही करणार आहे. त्यामुळे अनेक तरुण खेळाडूंना संधी मिळणार आहे. असे असली तरी, संघातील प्रत्येक खेळाडूने आपली जागा कायम आहे असे वाटून मोकळेपणाने खेळ करावा असे म्हणत रोहित शर्माने भारताचा कर्णधार विराट कोहलीला टोला लगावला आहे. 

आशिया करंडकात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. सततच्या संघ बदलांमुळे संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो आणि याच पार्श्वभूमीवर बोलताना तो म्हणाला, ''कोणत्याही खेळाडूला संघात सतत होणारा बदल आवडत नाही. संघातील प्रत्येक खेळाडूने सुरक्षित वाटून घ्यावे आणि मोकळेपणाने खेळ करावा अशी आमची इच्छा आहे.'' 

विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून फक्त एका कसोटी सामन्यात संघ कायम ठेवला आहे. कोहली आणि संघ व्यवस्थापनाच्या अशा धरसोड वृत्तीमुळे संघातील प्रत्येक खेळाडूंवरील दडपणात वाढ होत असून त्यांच्या कामगिरीवरही परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा सर्वोत्तम सलमीवीर असेलेल्या रोहित शर्मालाही कसोटी मालिकेत संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर त्याने या निर्णयावर उघडपणे नाराजीही व्यक्त केली होती. यातच आशिया करंडकाच्या सुरवातीला रोहित शर्माने विराट कोहलीला टोला लगावला आहे. 

आशिया करंडकात आज भारताचा सामना हाँगकाँगशी होणार आहे. त्यानंतर दिवसाचीही विश्रांती न घेता भारतीय संघ उद्या (बुधवार) पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल.

संबंधित बातम्या