रोहित शर्माने पत्नी रितिकासह सुरु केला वर्कआऊट  

टीम ई-सकाळ
Tuesday, 25 August 2020

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा, पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह काही दिवसांपूर्वीच यूएईमध्ये दाखल झाला आहे.

देशातील कोरोनाच्या संकटामुळे यंदाची इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा, पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह काही दिवसांपूर्वीच यूएईमध्ये दाखल झाला आहे. त्यानंतर आज रोहित शर्माने पत्नी रितिकासह तंदरुस्तीसाठी वर्कआऊट सुरु केला आहे. 

आता 'या' टेनिसपटूने घेतली यू.एस ओपनमधून माघार  

यंदाच्या बहुप्रतीक्षित आयपीएल स्पर्धेचा तेरावा हंगाम 19 सप्टेंबर पासून अमिरातीत सुरु होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी आयपीएलमधील सर्व संघांना 20 ऑगस्टपासून दुबईकडे रवाना होण्याचे आदेश बीसीसीआय फ्रांचायझींना दिले होते. त्यानुसार मुंबई इंडियन्सचा संघ काही दिवसांपूर्वीच दुबईकडे रवाना झाला होता. यानंतर संघाचे सर्व खेळाडू कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या नियमानुसार आठवडाभर क्वारंटाईन असणार आहेत. त्यामुळे रोहित शर्माने हॉटेलमध्येच तंदरुस्त राहण्यासाठी वर्कआऊट सुरु केला आहे. रोहित शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्कआऊट करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला असून, यादरम्यान रोहित शर्माची पत्नी रितिका देखील त्याच्यासोबत वर्कआऊट करत असल्याचे दिसत आहे.  

दरम्यान, यापूर्वी लॉकडाउननंतर घरातच सराव करत असलेल्या रोहित शर्माने जिममध्ये जाण्यास सुरवात केली होती. व त्याचा फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला होता. तर काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माने मुंबईत असताना फलंदाजीच्या नेट प्रॅक्टिसला सुरवात केली होती. आयपीएलमध्ये फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरील ट्विटरवर रोहित शर्मा फलंदाजीचा सराव करत असलेला व्हिडीओ शेअर केला होता.          


​ ​

संबंधित बातम्या