INDvsSA : रोहित, भावा कसोटीतही तूच एक नंबर!

वृत्तसंस्था
Wednesday, 2 October 2019

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा अध्याय सुरु करत आहे आणि सलामीवीर म्हणून पदार्पणातच तो झळकला आहे. वीरेंद्र सेहवागसारखी आक्रमक शैलीच्या खेळीची त्याच्याकडून सारेच अपेभा करत होते. त्यानेही नेहमीप्रमाणे मैदानात पाऊल ठेवले आणि आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. याचसह त्याने कसोटी कारर्किदीतील 11वे अर्धशतक साजरे केले. ​

विशाखापट्टणम : भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा अध्याय सुरु करत आहे आणि सलामीवीर म्हणून पदार्पणातच तो झळकला आहे. वीरेंद्र सेहवागसारखी आक्रमक शैलीच्या खेळीची त्याच्याकडून सारेच अपेभा करत होते. त्यानेही नेहमीप्रमाणे मैदानात पाऊल ठेवले आणि आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. याचसह त्याने कसोटी कारर्किदीतील 11वे अर्धशतक साजरे केले. 

रोहितने सलामीला उतल्यावर 84 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केेले. या खेळीमध्ये त्याने चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. सुरवातीला त्याने थोडा सावध खेळ केला. मात्र, चेंडू बॅटच्या बरोबर मध्यात येऊ लागल्यावर त्याने गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरवात केली. 

त्याने आफ्रिकेचे भले भले गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाहिल्या कसोटी सामन्याला आज सुरवात झाली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.


​ ​

संबंधित बातम्या