कसोटीतही सलामीला खेळण्यास तयार : रोहित शर्मा

वृत्तसंस्था
Friday, 17 August 2018

''मला आजवर कसोटी क्रिेकेटमध्ये सलामीला खेळण्यासाठी विचारले गेलेले नाही, परंतू संघ व्यवस्थापनाने संधी दिल्यास मी सलामीसही खेळण्यास तयार आहे.''

मुंबई : ''मला आजवर कसोटी क्रिेकेटमध्ये सलामीला खेळण्यासाठी विचारले गेलेले नाही, परंतू संघ व्यवस्थापनाने संधी दिल्यास मी सलामीसही खेळण्यास तयार आहे.'' अशा शब्दात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आपले मत व्यक्त केले आहे. 

मुंबईत एका कार्यक्रमात उपस्थित असताना त्याला ''कसोटी क्रिकेटमध्येही सलामीला का खेळत नाहीस?'' असा प्रश्न विचारण्यात आला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असेलेल्या कसोटी मालिकेत भारताने सलामीला मुरली विजय, शिखर धवन आणि लोकेश राहुला यांना आलटून पालटून संधी दिली, मात्र तिघांनाही संधीचे सोने करण्यात अपयश आले. 

रोहित शर्मा हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा विश्वासू सलामीवीर आहे. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं केली आहेत. भारताच्या सलामीवीरांची दुरावस्था पाहता त्याला हा प्रश्न विचारला गेला त्यावर ते म्हणाला, ''भारतीय संघात खेळायला लागल्यवर मी कधी सलामीवीर होईल असे मला वाटले नव्हते. पण ते काळानुसार होत गेले. मी नेहमी प्रत्येक पर्यायासाठी तयार असतो. त्यामुळेच जर मला कसोटी सामन्यात सलामीला खेळण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच खेळेन.''

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहितला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही याविषयी बोलताना तो म्हणाला, ''मी आणि माझे चाहते मला संघात स्थान मिळवून देऊ शकत नाही, हे फक्त निवड समिती, प्रशिक्षक आणि कर्णधाराच्याच हातात आहे.''

संबंधित बातम्या