भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी रोहित शर्मा रेडीमेड ऑप्शन

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

विराट कोहलीला कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवून, एकदिवसीय आणि टी -20 सामन्यांत रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्याची मागणी काही माजी खेळाडूंनी केली होती.

भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांविषयी बोलताना कपिल देव, सौरव गांगुली, महेंद्र सिंग धोनी आणि त्यानंतर सध्याचा कर्णधार विराट कोहली यांची नावे समोर येतात. क्रिकेटच्या तीनही प्रकारात सध्या विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार आहे. आणि एकदिवसीय आणि टी -20 सामन्यांत रोहित शर्मा उप-कर्णधार आहे. तर अजिंक्य रहाणे कसोटीत उप-कर्णधार आहे. महेंद्र सिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीने देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचे नेतृत्व धोनीप्रमाणेच उत्तम केले आहे. परंतू आयसीसीच्या एकाही महत्वाच्या स्पर्धेचे विजेतेपद विराटला मिळवता आलेले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अनेक जणांनी भारतीय संघाचे कर्णधारपद विभागण्याचा पर्याय असल्याचे म्हटले होते. विराट कोहलीला कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवून, एकदिवसीय आणि टी -20 सामन्यांत रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्याची मागणी काही माजी खेळाडूंनी केली होती. त्यानंतर आता माजी खेळाडू आकाश चोप्राने देखील पुढील वर्षापर्यंत विराट कोहलीकडे कर्णधारपद कायम राहणार आहे. मात्र त्यानंतर देखील भारतीय संघ आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेत अपयशी ठरल्यास भारतीय संघ नवीन नेतृत्वाबद्दल विचार करु शकतो, असे म्हटले आहे. 

टी -20 मधील दोन सामने खेळल्यानंतर श्रीलंकेत स्पर्धाच रद्द 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने एका मुलाखती दरम्यान, 2014 मध्ये विराटकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आल्यानंतर भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली असल्याचे म्हटले आहे. आणि 2017 मध्ये विराट भारताच्या तिन्ही संघांचा कर्णधार बनला. परंतू विराटला आयसीसीच्या एकाही महत्वाच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नसल्याचे आकाश चोप्राने सांगितले. त्यामुळे सध्यातरी विराट कोहलीकडे कर्णधारपद कायम राहणार आहे. मात्र आगामी आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेत भारतीय संघ अपयशी ठरल्यास नेतृत्वात बदल होण्याची शक्यता असल्याचे, आकाश चोप्राने या मुलाखतीत म्हटले. तसेच कर्णधारपदासाठी रोहित शर्मा रेडीमेड ऑप्शन असल्याचे आकाश चोप्राने सांगत, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ज्या-ज्या वेळेस रोहितने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे त्यावेळी भारताने चांगली कामगिरी केली असल्याचे आकाश चोप्राने सांगितले.    

2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती? श्रीलंकन सरकारची फौजदारी चौकशी सुरु       

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 199 एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये 110 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. तर 74 सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला. कसोटी प्रकारात धोनीच्या नेतृत्वाखाली 60 पैकी 27 सामने भारताला जिंकता आले. आणि टी -20 मध्ये 72 सामन्यांमध्ये धोनीने भारताचे प्रतिनिधित्व केले ज्यामध्ये 41 सामन्यात भारताचा विजय झाला. व विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 52 एकदिवसीय सामन्यांपैकी 39 भारताला जिकता आले आहेत. कसोटी आणि टी -20 प्रकारात प्रत्येकी 37 सामन्यांमध्ये विराटने भारताचे प्रतिनिधित्व करताना दोन्ही प्रकारात 17 सामने भारताने जिंकले आहेत.  

चेंडूला चमकावण्यासाठी आयसीसीने दुसरा पर्याय देणे गरजेचे - भुवनेश्वर कुमार

यासोबतच 2011 मध्ये महेंद्र सिंग धोनी कर्णधारपदी असताना भारताने एकदिवसीय सामन्यातील विश्वचषक आपल्या खिशात घातला होता. तसेच महेंद्र सिंग धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी-20 सामन्यांच्या विश्वचषकावर व 2013 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चॅम्पियन्स ट्रॉफी वर आपले नाव कोरले होते. 

 

 


​ ​

संबंधित बातम्या