आयपीएलमध्ये धोनीपेक्षा 'हा' कर्णधार आहे यशस्वी

वृत्तसंस्था
Saturday, 21 March 2020

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स अशा अनेक संघांनी चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्यांना कायम विजेतेपद पटकावता आलेलं नाही. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने सर्वाधिक चार विजेतेपद मिळवून आघाडी घेतली आहे.

मुंबई: कोरोना भीतीने क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारातील सामन्यांचे वेळापत्रक बिघडलं आहे. आयपीएलच्या तारखेबाबत अनिश्‍चितता आहे. आयपीएल हे क्रिकेटपटूंसह सर्वांनाच लाभदायी असते. क्रीडाप्रेमींसाठी तर ही मोठी मेजवानी असते. परंतु कोरोना व्हायरसमुळे त्यावर पाणी फेरले आहे. सलग बारा वर्षे म्हणजे एक तप उलटले आहे. 

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स अशा अनेक संघांनी चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्यांना कायम विजेतेपद पटकावता आलेलं नाही. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने सर्वाधिक चार विजेतेपद मिळवून आघाडी घेतली आहे. तर चेन्नई संघाने तीन वेळा चषक उंचावला. मुंबईच्या विजयात अर्थातच कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वगुणाचा मोलाचा वाटा आहे.त्याच्या नावावर आयपीएलमधील एका अनोख्या विक्रमाची नोंद आहे. 

रोहितच्या नावावर सर्वात कमी वयात आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा विक्रम आहे. याबाबत त्याने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला ओव्हरटेक केलं आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने 2013मध्ये प्रथम विजेतेपद मिळवलं. तेव्हा रोहितचे वय 26 वर्ष 27 दिवस होतं. त्यानंतर 2015 मध्ये रोहितने दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिले. तेव्हा तो 28 वर्षे 25 दिवसांचा होता. 

आयपीएलमध्ये धोनीने 29 वर्ष 9 महिने आणि 15 दिवस वय असताना पहिल्यांदा विजेतेपद मिळवलं होतं. रोहितने धोनीचा विक्रम 2013 मध्ये मागे टाकला. त्यानंतर पुन्हा एकदा 2015मध्ये रोहितने धोनीपेक्षा कमी वय असताना दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. आतापर्यंत वयाचे हे रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेलं नाही. ते त्याच्या नावावर अबाधति आहे. आयपीएलमध्ये धोनी सर्वाधिक यशस्वी आणि चाणाक्ष कर्णधार म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याची सद्दी आता संपली आहे. त्यामुळे आगामी काळात रोहितला केवळ विराट कोहलीचे आव्हान आहे.


​ ​

संबंधित बातम्या