विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे   

टीम ई-सकाळ
Sunday, 12 July 2020

भारतीय क्रिकेटच्या एकदिवसीय संघातील उपकर्णधार आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यांनी वर्ल्ड टी -20 च्या प्लेयिंग इलेव्हन संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे.

भारतीय क्रिकेटच्या एकदिवसीय संघातील उपकर्णधार आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यांनी वर्ल्ड टी -20 च्या प्लेयिंग इलेव्हन संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. टॉम मूडी हे आयपीएल मधील सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक असून, डेव्हिड वॉर्नरच्या ऐवजी टॉम मूडी यांनी रोहित शर्माला वर्ल्ड टी -20 कर्णधारपदी नेमल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी भारताचे क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी टॉम मूडी यांना वर्ल्ड टी -20 संघाच्या प्लेयिंग इलेव्हनसाठी खेळाडूंची निवड करण्यास सांगितले होते. त्यानंतर टॉम मूडी यांनी संघाची निवड करताना, आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेकदा विजेतेपद मिळवल्याने रोहित शर्माला वर्ल्ड टी -20 संघासाठी कर्णधार म्हणून निवडल्याचे सांगितले.  

सॅम्पदोरियाला नमवत सेरी ए फुटबॉलच्या क्रमवारीत अटलांटा तिसऱ्या स्थानी   

टॉम मूडी यांनी आपल्या वर्ल्ड टी -20 संघाची निवड करताना, पुढील तीन आठवड्यांच्या काळात क्रिकेट खेळू शकणाऱ्या खेळाडूंची निवड केली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच संघातील विकेटकीपर म्हणून महेंद्रसिंग धोनीची निवड केली नसल्याचे मूडी यांनी सांगितले. तसेच हिटमॅन रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरला सलामीवीर म्हणून निवडले आहे. यासोबतच टॉम मूडी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आपल्या संघात तिसरे स्थान दिले असून, यानंतर चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सचा समावेश केला आहे. टॉम मूडी यांनी निवड केलेले हे चारही खेळाडू सध्याच्या टी -20 क्रिकेट प्रकारात अव्वल कामगिरी करत आहेत. त्यामुळेच या खेळाडूंचा पहिल्या संघात समावेश केला असल्याचे मूडी यांनी सांगितले. 

पाक क्रिकेट संघाच्या मदतीसाठी धावून आला शाहिद आफ्रिदी ; वाचा काय आहे ते कारण     

यानंतर टॉम मूडी यांनी संघाचा विकेटकिपर म्हणून इंग्लंडच्या जोस बटलर आणि वेस्ट इंडिज संघाच्या निकोलस पूरण यांची तुलना करत निकोलस पूरणला पसंती दिली आहे. यासंदर्भात बोलताना मूडी यांनी, संघकातील मधल्या फळीत डावखुऱ्या फलंदाजाची गरज भरून काढण्यासाठी निकोलस पूरणची निवड करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून वेस्ट इंडीज संघाचा फलंदाज आंद्रे रसेल आणि अनुभवी फिरकीपटू सुनील नरेन यांची निवड केली आहे. याव्यतिरिक्त मूडी यांनी अफगाणिस्तानचा आघाडीचा गोलंदाज राशिद खान याची अतिरिक्त फिरकीपटू म्हणून निवड केली आहे. व वेगवान गोलंदाज म्हणून भारताच्या जसप्रीत बुमराह, इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि ऑस्ट्रेलियाचा अनुभवी मिशेल स्टार्क यांचा समावेश वर्ल्ड टी -20 संघाच्या प्लेयिंग इलेव्हनसाठी टॉम मूडी यांनी केला आहे. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे रवींद्र जडेजाला संघाचा 12 वा खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.

    


​ ​

संबंधित बातम्या