INDvsBAN : तीन वर्षांपासून हा विक्रम रोहितच करतोय, रोहितच मोडतोय!

वृत्तसंस्था
Friday, 8 November 2019

एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार -
रोहित शर्मा - 66* (2019)
रोहित शर्मा - 74 (2018)
रोहित शर्मा - 65 (2017)

राजकोट : भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात 85 धावांची शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने अनेक विक्रम मोडले. यातीलच एक म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम. 

INDvsBAN :  घ्या आता, तुम्हीच आणून बसवलाय त्याला आमच्या डोक्यावर

रोहित शर्माने गेल्या तीन वर्षांत सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने भारतीय संघाचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचाही विक्रम स्वत:च्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. रोहित शर्मा पूर्णवेळ भारताचा कर्णधार नसूनही त्याने धओनीचा हा विक्रम मोडला आहे. 

धोनीने भारताचा कर्णधार म्हणून आतंरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 62 डावांमध्ये 34 षटकार मारले आहेत. रोहितने कालच्या सामन्यात सहा षटकारांसह हा विक्रम मोडला. त्याने 17 डावांमध्ये 37 षटकार मारले आहेत. 

INDvsBAN : पंत, संघाला नेहमी लाज आणायचं स्किल येतं कुठून रे?

कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार
रोहित शर्मा - 37 (17)
एमएस धोनी - 34 (62)
विराट कोहली - 26 (26)

एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार 
रोहित शर्मा - 66* (2019)
रोहित शर्मा - 74 (2018)
रोहित शर्मा - 65 (2017)

 


​ ​

संबंधित बातम्या