कोहलीच्या कर्णधारपदाला रोहितचे आव्हान

वृत्तसंस्था
Tuesday, 25 September 2018

दुबई : #MakeRohitIndiancaptain हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत अहे. यामागचे कारणही तसेच आहे. इंग्लंड दौऱयात कसोटी मालिकेत संघात स्थान न मिळालेल्या रोहित शर्माने आशिया करंडकात प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळी केली आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तीन विजय मिळविले आहेत. त्यामुळे विराटपेक्षा रोहितची एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 111 धावांची खेळी करत भारताची अंतिम फेरी निश्चित केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितने एकदिवसीय क्रिकेटमधील 19वे शतक साजरे केले. भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असला तरी रोहितने येथेच कोहलीला मागे टाकले आहे. रोहित आणि कोहली दोघांनीही 2015पासून एकदिवसीय क्रिकेटमध्यो 14 शतके केली आहेत. मात्र, रोहितने ही शतके 61 डावांमध्ये पूर्ण केली आहेत तर कोहलीला  मात्र यासाठी 64 डाव खेळावे लागले आहेत. 

इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्व कौशल्यांवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया करंडकात उत्तम कामगिरी करत आहे. यामुळे सोशल मीडियावर रोहित शर्माला भारताचा कर्णधार करा असा ट्रेंड सुरु झाला आहे. रोहितनेही सामन्यावेळी गोलंदाजीत केलेले बदल हे भारताला यश मिळवून देणारे ठरले आहेत. त्याच्या याच कर्णधारपदाच्या गुणांचे कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या