INDvsSL : आता मला विश्रांती हवीये; भारताच्या 'या' प्रमुख खेळाडूची मागणी

वृत्तसंस्था
Monday, 23 December 2019

भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच जानेवारीला ट्वेंटी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत तीन ट्वेंटी20 सामने होणार आहेत. यातील पहिला सामना पाच जानेवारीला गुवाहाटीला होणार आहे. दुसरा सामना सात जानेवारीला इंदूरला तर तिसरा सामना दहा जानेवारीला पुण्यात होण्यात आहे. 

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर रोहित शर्मासाठी यंदाचं वर्ष अफलातून ठरलेलं आहे. त्याने वर्षभरात खोऱ्याने धावा केल्या आहेत. तो गेलं वर्षभर खेळत असल्याने त्याला जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध  होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच जानेवारीला ट्वेंटी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत तीन ट्वेंटी20 सामने होणार आहेत. यातील पहिला सामना पाच जानेवारीला गुवाहाटीला होणार आहे. दुसरा सामना सात जानेवारीला इंदूरला तर तिसरा सामना दहा जानेवारीला पुण्यात होण्यात आहे. 

Rohit Sharma

INDvsWI : शार्दुल भावा, विराटने चक्क केलं मराठीत कौतुक, पाहा...

''ट्वेंटी20 संघातील कोणत्याही खेळाडूला निवड समिती सहसा विश्रांती देत नाही. मात्र, रोहित बऱ्याच काळापासून विश्रांती मागणी करत आहे. त्याला या मालिकेसाठी विश्रांती हवी असल्याचे त्याने स्वत:हून बीसीसीआयला कळवले आहे,'' अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. 

INDvsWI : अर्धशतकासह 'हिटमॅन'ने मोडला 22 वर्षांपूर्वीचा विक्रम

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्विधाक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याने अव्वल क्रमांक गाठला आहे. त्याने वर्षभरात 28 एकदिवसीय सामन्यांमध्ये 57.30च्या सरासरीने 1490 धावा केल्या आहेत. यामध्ये सात शतकं आणि सहा अर्धशतकं आहेत. गेलं वर्षभर तो खेळत असल्याने त्याला श्रीलंकेविरुद्ध त्याला विश्रांती देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

​ ​

संबंधित बातम्या