INDvsBAN : शतकी सलामीचा विक्रमी 'चौकार', रोहित-धवननने गाठले 'शिखर'

शैलेश नागवेकर
Friday, 8 November 2019

एवढी कमी संधी आणि धोके अधिक असतानाही भारताच्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी या प्रकारात तब्बल चार वेळी शतकी धावांची सलामी दिली. क्रिकेटविश्वात हा विक्रम आहे. अशी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.

राजकोट : ट्वेन्टी-20 म्हणजे 120 चेंडूंचा खेळ. सरासरी धावा होतात 150 ते 160  त्यात शंभर धावांची सलामी म्हणजे फारच झाली. यातून सलामीच्या जोडीची ताकद समजून येते. सलामीवीरांनी जर शंभर धावांची सुरुवा करुन दिली तर डोक्यावरून पाणी असेच समजले जाते. कारण या प्रकारात जम बसवण्यासाठी वेळ नसतो, पहिल्या षटकापासून हल्लाबोल करायचा असतो. या आक्रमकतेत एखादा फटका चुकला की विकेट जाण्याची भीती. एवढी कमी संधी आणि धोके अधिक असतानाही भारताच्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी या प्रकारात तब्बल चार वेळी शतकी धावांची सलामी दिली. क्रिकेटविश्वात हा विक्रम आहे. अशी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.

INDvsBAN : कोलकता डे-नाईट कसोटीत नाणेफेकीसाठी वापरणार सोन्याचे नाणे 

बांगलादेशविरुद्ध राजकोटला गुरूवारी झालेल्या सामन्यात रोहित-धवन यांनी हा शतकी सलामीचा चौकार मारला.  रोहित आणि धवन यांचा पिंड हा आक्रमक टोलेबाजीचा. एकाकडून तरी ज्योतीचे वणव्यात रुपांतर झाले की त्रिशतकी धावांची सलामी बघता बघता फलकावर लागते. गुरुवारच्या सामन्यात हेच घडले रोहित फारच स्फोटक फलंदाजी करत होता त्यावेळी धवन त्याला साथ देत होता. कधी कधी दोन्ही बाजूंनी असा प्रहार सुरु झाली की गोलंदाजांनी मात्र शरणागती स्वीकारलेली असते.

Rohit Sharma, Shikhar Dhawan

रोहित-धवनचा का ?
आता प्रश्न आहे क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांच्याकडेही तडाखेबंद सलामीवर असताना त्यांच्याकडून असा विक्रम का झालेला नाही. याचे पहिले कारण म्हणजे रोहित आणि धवन यांची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि जय-वीरूची जोडी. भारतीय संघ व्यवस्थापन प्रत्येक खेळाडूवर विश्वास ठेवतो. एखाद्या सामन्यात खराब कामगिरी झाली की लगेचच त्याला वगळत नाही. धवन गेल्या काही सामन्यांमध्ये अपेक्षा पूर्ण करत नसला तरी त्याला संधी दिली जात आहे. ऑस्ट्रेलियाकडे डेव्हिड वॉर्नर-अॅरॉन फिन्च अशी सलामीची जोडी आहे. पण आमची रोहित-धवन जोडी लय भारी आहे. 

INDvBAN : हिटमॅनच्या 'महा'वादळापुढे बांगलादेश भुईसपाट; मालिका 1-1 बरोबरीत!

सचिन-गांगुली असले तर ?
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या सलामीच्या जोडीने अनेक विक्रम केले आहे. सचिन केवळच एकच ट्वेन्टी-20 सामना खेळला तर गांगुलीला एकही सामना खेळता आलेला नाही. त्यांच्या काळात ट्वेन्टी-20 चे जास्त प्रमाणात सामने झाले असते तर कदाचीत या जोडीनेही असेच विक्रम केले असते पण शेवटी या जर तरच्या गोष्टी झाल्या.


​ ​

संबंधित बातम्या