अजिंक्य रहाणे-रोहित शर्माला सरावासाठी वाट पहावी लागणार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

मुंबई क्रिकेट संघाकडे मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम, बांद्रा कुर्ला परिसर आणि सचिन तेंडूलकर जिमखाना ही सर्व मैदाने सरकारी निर्देशांनुसार बंद ठेवण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत, भारतात देखील चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. केंद्रिय गृह मंत्रालयाने देशातील स्टेडीयम आणि कॉमप्लेक्स खेळाडूंच्या सरवासाठी खुली करण्याची परवानगी दिली आहे, मात्र रोहित शर्मा आणि अजिंक्य राहणे यांना त्यांच्या वयक्तिक सरावासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने रेड झोन असलेल्या भागात खेळाडूंना सरावची अद्याप परवाणगी दिलेली नाही. ग्रिन झोन आणि ऑरेंज झोन मधील खेळाडू प्रेक्षकांवीना स्टेडिअममध्ये खेळण्याची परवाणगी दिली आहे. 

मुंबई क्रिकेट संघाकडे मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम, बांद्रा कुर्ला परिसर आणि सचिन तेंडूलकर जिमखाना ही सर्व मैदाने सरकारी निर्देशांनुसार बंद ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारने केलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करणार असल्याचे मुंबई क्रिकेट संघाच्या आधिकाऱ्यांनी पिटीआयशी बोलतीना सांगीतले. त्यामुळे त्या मैदानाच्या जवळपासा राहणाऱ्या क्रिकेटपटूंना सध्यातरी या मैदानावरती सराव करता येणार नाहीये. 

गृह मंत्रालयाने याआधीत देशातील सर्वा एथेलिटना घालून दिलेल्या नियमांचे पालन करत सराव करण्यास परवाणगी देण्यात आली आहे. क्रीडा मंत्री किरेन रिजजू यांनी मंगळवारी क्रीडा संघांना स्टेडीयम मध्ये स्पर्धा आयोजीत करण्यास परवाणगी दिली आहे. या स्पर्धेसाठी दर्शकांना उपस्थीत राहण्याची परवाणगी नसणार आहे. तसेच खेळाडूंसाठी देखील कडक नियम घालून दिले आहेत. मैदानावर थूंकणे, आलिंगण देणे, हस्तांदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या