US Open : फेडररचा चौथ्या फेरीत धक्कादायक पराभव

वृत्तसंस्था
Tuesday, 4 September 2018

स्वित्झर्लंडचा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररला अमेरिकन ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला आहे. जागतिक क्रमवारीत 55व्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने फेडररचा टायब्रेकमध्ये 3-6,7-5,7-6(9/7),7-6(7/3) असा पराभव केला.

मेलबर्न : स्वित्झर्लंडचा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररला अमेरिकन ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला आहे. जागतिक क्रमवारीत 55व्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने फेडररचा टायब्रेकमध्ये 3-6,7-5,7-6(9/7),7-6(7/3) असा पराभव केला. उपांत्यफेरीत त्याला आता सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचे आव्हान असेल. 

फेडररने पाचवेळा अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र त्याला मिलमनविरुद्धच्या सामन्यात प्रचंड कडवी झुंज द्यावी लागली. पहिला सेट फेडररने जिंकल्यावर मिलमनने जोरदार पुनरागमन करत सलग पुढील दोन सेट जिंकले. त्याने केलेल्या प्रतिकारातून फेडरर आणि त्याचे चाहते बाहेर आलेच नाहीत. हा सामना तीन तास 38 मिनिटे चालला. मिलमनने प्रथमच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.

मिलमनने यापूर्वी एकदाही टॉप 10 खेळाडूंविरुद्ध विजय मिळवलेला नाही. या सामन्यात मात्र त्याने दिग्गज रॉजर फेडररला पराभवाचा धक्का दिला. रॉजर फेडररचा हा जागतिक क्रमवारीत 50पेक्षा खालील स्थानावर असलेल्या खेळाडूकडून झालेला पहिला पराभव आहे.


​ ​

संबंधित बातम्या