रॉजर फेडरर, पत्नी मिरका यांची गरजू कुटुंबांना मोठी मदत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

रॉजरने त्याची पत्नी मिर्का सोबत मीळून जवळपास 7.70  करोड इतकी रक्कम कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या कुटूंबाना दान केली आहे.

कोरोनाच्या संकटाशी जगभर लढा दिला जात आहे, असे असताना स्वीस खेळाडू, टेनिसचा बादशहा रॉजर फेडरर याने कोरोना व्हायरस पिडीतांना दहा लाख स्विस फ्रँक डॉलर दान केले आहेत. आतापर्यंत 20  वेळा ग्रॅंडस्लॅम चॅम्पियन ठरलेल्या रॉजरने त्याची पत्नी मिर्का सोबत मीळून जवळपास 7.70  करोड इतकी रक्कम कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या कुटूंबाना दान केली आहे.

त्याने ट्विटरवर केलेल्या एका निवदनात म्हटले आहे की, “सध्या जग आव्हाणात्मक परिस्थीतीमधून जात आहे आणि अशा प्रसंगात कोणालाही मागे सोडता येणार नाही. त्यासाठी मी अणि माझी पत्नी मिर्का दोघांनी वयक्तिक एक मिलीयन स्विस फ्रॅँक स्विझरलँडमधील गरजूंना दान करण्याचा निर्णय घेतला आहे.” त्यापुढे त्याने लिहीलं की, “आम्ही केलेली मदत ही फक्त एक सुरुवाथ आहे, शक्य असेल त्या सगळ्यांना गरजू कुटूंबाना मदत करावी. सगळ्यांच्या सहकार्याने आपण या सगळ्यातून बाहेप पडूयात. निरोगी राहा.”

गरजूंना सौरव गांगुली करणार 50 लाखांची मदत

जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे, सगळ्या देशांनी व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी त्यांच्या देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. मार्च 25 पर्यंत जगात कोरोना बाधीतांचा आकडा 428,400 झाला आहे तर 19,000 लोकांनी त्यांचा जीव गमावला आहे. स्विझरलँडमध्ये सध्या रुग्णांची सख्या वाढत आहे, जागात कोरोना रुग्णांच्या संख्येच्या क्रमवारीत नवव्या क्रमांकांचा देश आहे. आजवर स्विझरलँडमध्ये 100 पेक्षा जास्त नागरीक कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडले आहेत. 

कोरोनापासून बचावासाठी विराट-अनुष्काचा खास संदेश 

जगभरातून खेळाडू कोरोना पिडीतांना मदत करत आहेत, अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू मेसी तसेच रोनाल्डो यांनी देखील कोरोनाबाधीत रुग्णांच्या इलाजासाठी आर्थिक मदत केली. 
 


​ ​

संबंधित बातम्या