फेडररच्या पाठीत बसला जोकोविचचा फोरहँड 

वृत्तसंस्था
Saturday, 22 September 2018

गेम संपल्यानंतर फेडरर जोकोविचला म्हणाला, "म्हणूनच आपण दुहेरीत खेळत नाही, बरोबर ना?' त्यावर जोकोविच उत्तरला, की अरे देवा, क्षणभर माझी छाती दडपून गेली होती. 

शिकागो : लेव्हर करंडक प्रदर्शनी सामन्याचे आकर्षण ठरलेल्या नोव्हाक जोकोविच-रॉजर फेडरर यांच्या दुहेरी सामन्यात वेगळाच किस्सा घडला. जोकोविचचा फोरहॅंड फेडररच्या पाठीला लागला.

गेम संपल्यानंतर फेडरर जोकोविचला म्हणाला, "म्हणूनच आपण दुहेरीत खेळत नाही, बरोबर ना?' त्यावर जोकोविच उत्तरला, की अरे देवा, क्षणभर माझी छाती दडपून गेली होती. 

हे दोघे एकत्र दुहेरीत प्रथमच खेळले. "टीम युरोप'ने "टीम वर्ल्ड'वर त्याआधीच 3-0 अशी विजयी आघाडी घेतली होती, पण या लढतीचे आकर्षण कायम होते. केव्हिन अँडरसन आणि जॅक सॉक यांच्याविरुद्ध जोकोविच-फेडरर कोर्टवर उतरले. जोकोविचने बेसलाइनवरून मारलेला क्रॉस-कोर्ट फोरहॅंड फेडररच्या पाठीत खाली लागला.

फेडरर तेव्हा नेटजवळ होता. सुदैवाने त्याला फार लागले नाही. त्याने एरवी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या जोडीदाराची चूक खिलाडूवृत्तीने घेतली. दुसरीकडे जोकोविचने त्याचा चेहरा झाकून घेतला. ही लढत मातब्बर जोडीने 6-7, 6-3, 6-10 अशी गमावली.

संबंधित बातम्या