World Cup 2019 : अष्टपैलू पंड्या, शंकरच जिंकविणार विश्वकरंडक

रॉजर बिन्नी
Wednesday, 15 May 2019

वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ प्रदीर्घ अशा मोसमानंतर विश्‍वकरंडकासाठी जात आहे. ते कोणत्या तरी प्रकारचे क्रिकेट खेळत आहेत ही चांगली गोष्ट आहे. आता वस्तुस्थिती अशी आहे की काही वेळा क्रिकेटचा अतिरेक होत आहे, असा अर्थ लावला जाऊ शकतो, पण शेवटी आधुनिक काळातील क्रिकेट असेच असते.

विश्‍वकरंडकासाठी ताजेतवाने राहण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. एक चांगली गोष्ट अशी की गोलंदाज वन-डे सामन्यात "रिलॅक्‍स' होऊ शकतात. टी-20 सारखी स्थिती नसते. त्यात पहिल्या चेंडूपासून फलंदाज चौफेर टोलेबाजीसाठी प्रयत्नशील असतात.

वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ प्रदीर्घ अशा मोसमानंतर विश्‍वकरंडकासाठी जात आहे. ते कोणत्या तरी प्रकारचे क्रिकेट खेळत आहेत ही चांगली गोष्ट आहे. आता वस्तुस्थिती अशी आहे की काही वेळा क्रिकेटचा अतिरेक होत आहे, असा अर्थ लावला जाऊ शकतो, पण शेवटी आधुनिक काळातील क्रिकेट असेच असते.

विश्‍वकरंडकासाठी ताजेतवाने राहण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. एक चांगली गोष्ट अशी की गोलंदाज वन-डे सामन्यात "रिलॅक्‍स' होऊ शकतात. टी-20 सारखी स्थिती नसते. त्यात पहिल्या चेंडूपासून फलंदाज चौफेर टोलेबाजीसाठी प्रयत्नशील असतात.

आयपीएलपूर्वी आपल्याकडे ऑस्ट्रेलियन संघ आला होता. त्यामुळे एका अर्थाने मोसम बराच काळ चालला. अशावेळी भारतीय संघाने सुसंघटित होणे आणि सामना खेळण्याइतपत तंदुरुस्त राहण्याची वेळ आली आहे. मी इतर बहुतेक संघांचे अवलोकन करीत आहे. बहुतेक जण तयारीसाठी वन-डे क्रिकेट खेळत आहेत. पाकिस्तान तर इंग्लंडमध्ये जवळपास 11 सामने खेळणार आहे. ही कुणाच्या फायद्याची गोष्ट आहे असे मला वाटत नाही.

Image may contain: text

तुम्ही कसोटी मालिका खेळणार असाल तर इतक्‍या लवकर जाऊ शकता, कारण इंग्लंडमधील वातावरण वेगळे असते. कसोटी सामन्यांत खेळपट्टीवरून चेंडू स्विंग होऊ शकतो आणि काही प्रकारे "मूव्ह' होऊ शकतो. वन-डे आणि टी-20 मध्ये मात्र याचे फारसे तंत्र नसते. बहुतांश वेळा खेळपट्ट्या ठणठणीत असतात. चेंडू "सीम' होत असला तरी तुम्हाला तो फटकावण्याची गरज असते, कारण तुमच्या हाताशी वेळ थोडा असतो. अशा वेळी वातावरणाशी जुळवून घेण्याची पद्धत कसोटी क्रिकेटसाठी चांगली असते, पांढऱ्या चेंडूवरील क्रिकेटसाठी नव्हे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघाला वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागणार नाही, कारण सर्फराज अहमदच्या संघाचा अलीकडील फॉर्म खराब आहे.

मी म्हणालो त्याप्रमाणे तंदुरुस्ती यशातील महत्त्वाचा घटक असेल. केदार जाधवबाबत काहीशी शंका आहे. तो तंदुरुस्त नसेल तर मी रिषभ पंतला पसंती देईन. कोणत्याही गोलंदाजीच्या चिंधड्या उडवून तुम्हाला सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंपैकी तो आहे. दहा षटके किंवा अर्ध्या तासात तो सामन्याचे पारडे फिरवू शकतो. महत्त्वाची विजेतिपदे जिंकायची असेल तर तुमच्याकडे त्याच्यासारखे खेळाडू हवेत. काही प्रसंगी परिपक्वतेअभावी तो चुकीच्या फटक्‍यांची निवड करू शकतो, पण शेवटी एखादी व्यक्ती त्याशिवाय शिकणार तरी कशी? जास्त खेळूनच तुम्ही संघातील स्थान कमावू शकता. तो दीर्घकालीन गुंतवणूक करावा, असा खेळाडू आहे.

मला महंमद शमीची मात्र काळजी वाटते. इंग्लंडमध्ये तुम्हाला चेंडू "स्विंग' करावा लागतो, कारण खेळपट्ट्या वेगवान नसतात. शमीकडे वेग आहे, पण 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी फारशी चालत नाही. तो सुरवातीला चांगला मारा करू शकतो, पण अंतिम टप्प्यात ओझे ठरतो. त्या वेळी तुमच्याकडे भुवनेश्‍वर किंवा पंड्यासारखे वैविध्य असलेले गोलंदाज हवेत. दुसरीकडे बुमरा विश्‍वकरंडकात उपयुक्त ठरेल. त्याची तंदुरुस्ती भारतासाठी महत्त्वाची असेल.
चौथा वेगवान गोलंदाज म्हणून मी नवदीप सैनीला पसंती दिली असती. याचे कारण मला त्याची अलीकडील कामगिरी आवडली आहे. त्याच्याकडे वेग आहे. तो भेदक मारा करू शकतो. या घडीला सैनी हा भारतातील सर्वोत्तम तरुण वेगवान गोलंदाज आहे, पण भारताने चौथ्या वेगवान गोलंदाजाऐवजी अष्टपैलू विजय शंकरची निवड केली आहे. तो चेंडू स्विंग करू शकतो आणि उपयुक्त फलंदाजी करू शकतो. हे महत्त्वाचे ठरेल, कारण तळात बुमरा, चहल आणि शमी आहेत, जे फलंदाजीत अगदीच कच्चे आहेत.

पंड्या व शंकर हे अष्टपैलू फार महत्त्वाचे आहेत. ते उपयुक्त षटके टाकू शकतात आणि फलंदाजीत वाटा उचलू शकता.
अनेक खेळाडूंसाठी आयपीएलची वेळ चुकीची ठरली, कारण त्यामुळे बराच मानसिक थकवा येतो. मला वाटते अजून वेळ आहे, त्यामुळे फलंदाज स्थिरावू शकतात. वन-डे मध्ये "रिलॅक्‍स' व्हायला थोडा वेळ मिळतो.

आम्ही 1983 च्या स्पर्धेला कोणतेही दडपण न घेता गेलो. त्यानंतर मात्र बहुतेक वेळा संभाव्य विजेते म्हणून भारतीय संघ गेला. संघाने योग्य वेळी कामगिरी उंचावली तर अंतिम उद्दीष्टापर्यंत ते नक्कीच मजल मारू शकतील. इंग्लंडचा संघ नक्कीच "फेव्हरीट' असेल. त्यांची फलंदाजी ताकदवान, तर गोलंदाजी उपयुक्त आहे. याशिवाय त्यांना वातावरणाचा सराव आहे. इतर संघांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड यांच्याकडे लक्ष ठेवावे लागेल. अनपेक्षित निकालाच्या पलीकडे जाऊन कामगिरी करणारा संघ म्हणून माझा पाठिंबा असेल तो वेस्ट इंडीजला

संबंधित बातम्या