विदेशी टी-२० लिग खेळण्याची परवानगी द्या, रॉबिन उथप्पाची ‘बीसीसीआय’कडे मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

रॉबिन उथप्पा याला इंडीयन सुपर लीग 2020 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने विकत घेतले आहे.

भारतीय संघाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा यांने सुरेश रैना आणि इरफान पठाण यांच्या मागणीला पाठिंबा देत भारतीय खेळाडूंना परदेशात होणाऱ्या टी20 लीग मध्ये खेळण्याची परवाणगी देण्याची विनंती बीसीसीआयकडे केली आहे. बीसीसीआय भारतीय खेळाडूंना अशा लीग सामन्यामध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे अंतराष्ट्रीय संघातून बाहेर पडल्यावर खेळाडूंना थेट निवृत्ती स्विकारावी लागते, त्यामुळे खेळाडू ही मागणी करताना दिसत आहेत.  

तर इरफान पठाण आणि सुरेश रैना यांनी भारतीय खेळाडूंना परदेशात होणाऱ्या टी20 लीग मध्ये खेळण्यास परवानगी देण्याचा मुद्दा इस्टांग्रामया सोशल मिडीयावर गप्पा मारताना चर्चेत आणला होता. युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा यासारख्या खेळाडूंचे बीसीसीआय़सोबत कसलेही करार झाले नाहीत अशा खेळाडूंना परदेशात होणाऱ्या टी20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली पाहिजे असे मत रैनाने व्यक्त केले होते. 

"माझ्या काळात फक्त 2-3 खेळाडूच यो-यो टेस्ट पास झाले असते : मोहम्मद कैफ"

“परदेशातील लीग मध्ये खेळण्याची परवानगी नसणे ही गोष्ट खेळाडूंना हताश करणारी आहे. पुन्हा प्रथम श्रेणी क्रिकेच खेळण्यासाठी स्वतःला तयार करणे कठीण असते. जर खेळाडूंना काही देशात खेळण्याची परवानगी मिळाली तर ती चांगली गोष्ट असेल, खेळाडूंना नवे अनुभव घेता येतील तसेच बऱ्याच गोष्टी शिकता येतील.” असे मत रॉबिन उथप्पाने व्यक्त केले. 

यावर्षीच्या आयपीएल हंगामासाठी 34 वर्षीय रॉबिन उथप्पा याला इंडीयन सुपर लीग 2020 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने विकत घेतले आहे.  मागच्या पाच वर्षांपासून भारतीय संघाबाहेर अशल्याने तो फक्त स्थानिक क्रिकेट आणि आय़पीएल सामने खेळत असतो. आयपीएलमध्ये रॉबिनने 177 सामन्यांमध्ये 130 च्या सरासरीने 4 हजार 441 धावा केल्या आहेत. बीसीसीआयने करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आयपीएलचा तेरावा हंगाम अनिश्चीत काळासाठी स्थगित केला आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला 4 हजार कोटींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय ही स्पर्धा वर्षाअखेरीस आयोजित करता येणं शक्य आहे का याची चाचपणी करत आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या