भारताला मिळणार नवा यष्टीरक्षक?

वृत्तसंस्था
Friday, 17 August 2018

ढगाळ वातावरणात भारताचा संघ गुरुवारी सरावाला ट्रेंट ब्रीजच्या मैदानावर आला तेव्हा युवा खेळाडू रिषभ पंतने यष्टीरक्षण आणि फलंदाजीचा सर्वाधिक सराव केला. त्यामुळे भारतीय कसोटी संघाला नवीन यष्टीरक्षक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नॉटिंगहम : ढगाळ वातावरणात भारताचा संघ गुरुवारी सरावाला ट्रेंट ब्रीजच्या मैदानावर आला तेव्हा युवा खेळाडू रिषभ पंतने यष्टीरक्षण आणि फलंदाजीचा सर्वाधिक सराव केला. त्यामुळे भारतीय कसोटी संघाला नवीन यष्टीरक्षक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांचे अपयश ही सर्वांचीच डोकेदुखी बनली आहे. विराट कोहली सोडला तर कोणत्याही फलंदाजाचा इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर टिकाव लागला नाही. वृद्धीमान सहाला दुखापत झाल्याने भारताचा अत्यंत अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला संघात संधी देण्यात आली मात्र तो फलंदाजी आणि यष्टीरक्षण या दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरला. त्यामुळेच तिसऱ्य़ा कसोटी सामन्यासाठी रिषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी रिषभ पंतबद्द्ल शनिवारी 11 वाजता निर्णय सांगू असे सांगितले आहे. मात्र गुरुवारच्या सरावादरम्यान पंतने सलामीवीरांसोबत फलंदाजीचा सराव केला तर बराच काळ तो यष्टीरक्षणही करत होता. याउलट सरावादरम्यान दिनेश कार्तिक फार काळ दिसलाच नाही.

कोहलीला पाठदुखी झालेली असल्याने तिसऱ्या कसोटी सामन्यातील त्याच्या सहभागाबद्दल अजूनही साशंकता आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा तंदुरुस्त झाल्याने त्याला संघात स्थान दिले जाईल, तर कार्तिक ऐवजी पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिखर धवनलाही संघात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता आहे. कोहली तिसऱ्या सामन्यात खेळला तर लोकेश राहुल किंवा मुरली विजय यांपैकी एकाला शिखर धवनसाठी बाहेर बसावे लागेल. 

संबंधित बातम्या