व्वा रिषभ!, पहिली रन आणि पहिले शतकही षटकाराने

वृत्तसंस्था
Wednesday, 12 September 2018

लंडन : भारतीय संघात यष्टीरक्षणाची धुरा मोठ्या जबाबदारीने पार पाडणाऱ्या रिषभ पंतने पाचव्या सामन्याच्या अखेरच्या दिवशी फलंदाजीतही चमक दाखवली. इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा तो भारताचा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. तसेच चौथ्या डावात शतक करणारा तो भारताचा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. 

पंत अखेरच्या दिवशी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आला. त्याने 146 चेंडूंमध्ये 15 चौकार आणि चार षटकार खेचत 114 धावा केल्या. पंतने केलेल्या या कामगिरीमुळे कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा क्रिडाविश्वातील तो फक्त दुसरा सर्वात युवा यष्टीरक्षक ठरला आहे. यापूर्वी भारतातील कोणत्याही यष्टीरक्षकाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिकेत शतक केले नव्हते. त्यामळे अशी कामगिरी करणारा पंत हा भारताचा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. भारताच्या 2014च्या इंग्लंड दौऱ्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेल्या 92 धावा ही भारतीय यष्टीरक्षकाची इंग्लंडमधील सर्वोत्तम कामगिरी होती. मात्र रिषभ पंतने केलेल्या शतकामुळे त्याने धोनीलाही मागे टाकले. 

रिषभ पंतसाठी इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका चांगलीच योगायोगांची ठरली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतने आपली पहिली धाव षटकार खेचत काढली तर काल (मंगळवार) कसोटी क्रिकेटमधील आपले पहिले शतकही त्याने उत्तुंग षटकार खेचत पूर्ण केले.

​ ​

संबंधित बातम्या