रिषभ पंतचा लाजीरवाणा विक्रम

वृत्तसंस्था
Saturday, 1 September 2018

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना चमकदार कामगिरी करता आलेली नाही. यष्टीरक्षक रिषभ पंतने या डावात लाजीरवाणा विक्रम केला आहे.

साउदम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना चमकदार कामगिरी करता आलेली नाही. यष्टीरक्षक रिषभ पंतने या डावात लाजीरवाणा विक्रम केला आहे.

चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) रिषभ पंत भोपळाही न फोडता बाद झाला. त्याने तब्बल 29 चेंडूंचा सामना केला, पण त्याला एकही धाव करता आली नाही. रिषभ या लाजीरवाण्या विक्रमामुळे सर्वांधिक चेंडू खेळून एकही धाव न करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाला आहे. यापूर्वी अशी कामगिरी इरफान पठाणच्या नावावर आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 29 चेंडू खेळून एकही धाव केली नव्हती. रैनानेही इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत अशी कामगिरी केलेली आहे. रिषभ आता या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

षटकार खेचून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रिषभला महेंद्रसिंह धोनीचा वारसदार संबोधले जाते. त्यामुळे लवकरात लवकर हा विक्रम विसरून रिषभला पुढे जावे लागणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या