गोलंदाजीला मिळाली क्षेत्ररक्षकांची साथ अन् मग...!

टीम ई सकाळ
Wednesday, 22 August 2018

नॉटिंगहम कसोटी सामन्यात भारताने सर्वोत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करत इंग्लंडवर 203 धावांनी मात केली. दोन्ही डावांमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजीसमोर टिकाव लागला नाही. यामध्ये गोलंदाजांबरोबर क्षेत्ररक्षकांचीही मोठी कामगिरी होती. या सामन्यात रिषभ पंत आणि लोकेश राहुल यांनी प्रत्येकी सात झेल घेत  'कॅचेस विन मॅचेस' ही उक्ती सिद्ध केली. 

नॉटिंगहम : नॉटिंगहम कसोटी सामन्यात भारताने सर्वोत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करत इंग्लंडवर 203 धावांनी मात केली. दोन्ही डावांमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजीसमोर टिकाव लागला नाही. यामध्ये गोलंदाजांबरोबर क्षेत्ररक्षकांचीही मोठी कामगिरी होती. या सामन्यात रिषभ पंत आणि लोकेश राहुल यांनी प्रत्येकी सात झेल घेत  'कॅचेस विन मॅचेस' ही उक्ती सिद्ध केली. 

एकाच संघातील दोन खेळांडूंनी प्रत्येकी सात झेल घेण्याची ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. रिषभ पंतने पहिल्या डावात कूक, जेनिंग्ज, पोप, वोक्स, रशिद तर दुसऱ्या डावात जेनिंग्ज आणि वोक्सचे झेल घेतले. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या लोकेश राहुलने पहिल्या डावात रुट, बेअरस्टो, स्टोक्स तर दुसऱ्या डावात कुक, जेनिंग्ज, रुट, स्टोक्स आणि ब्रॉडचे झेल घेतले. 

तसेच या सामन्याच्या प्रत्येक डावांत दोन्ही संघाच्या पहिल्या पाच फलंदाजांनी 10 पेक्षा जास्त धावा केल्या. ही कामगिरीसुद्धा कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केली गेली आहे. सामन्याच्या अखेरच्या दिवशी निकालासाठी फक्त एकच फलंदाज शिल्लक राहण्याची इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमधील ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी 1976मध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर इंग्लंड नऊ बाद 125 धावांवर असताना त्यांचा डाव 126 धावांत संपला आणि वेस्ट इंडिजने हा सामना 425 धावांनी जिंकला होता. 
 

संबंधित बातम्या