विश्वकरंडकासाठी रिषभ पंत सज्ज नाही : सेहवाग

वृत्तसंस्था
Friday, 14 September 2018

नवी दिल्ली : पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडकासाठी भारताच्या यष्टीरक्षकाची जबाबदारी रिषभ पंतकडे सोपविण्यात यावी अशी अनेकांची इच्छा असताना भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने मात्र तो अजूनही विश्वकरंडकासाठी तयार नसल्याचे मत व्यक्त केले. 

नवी दिल्ली : पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडकासाठी भारताच्या यष्टीरक्षकाची जबाबदारी रिषभ पंतकडे सोपविण्यात यावी अशी अनेकांची इच्छा असताना भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने मात्र तो अजूनही विश्वकरंडकासाठी तयार नसल्याचे मत व्यक्त केले. 

''भारताचा सध्याचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडकापर्यंत खेळायला हवे. पंतला आता एकदिवसीय संघात जागा दिली तरी विश्वकरंडकापर्यंत तो फक्त 15-16 सामने खेळू शकेल. एवढ्या कमी अनुभवावर त्याला विश्वकरंडकासाठी संघात स्थान देणे योग्य होणार नाही. कारण धोनीकडे 300हून अधिक सामने खेळण्याचा अनुभव आहे,'' असे मत सेहवागने व्यक्त केले. 

''कोणत्याही चेंडूवर षटकार मारण्याची पंतकडे क्षमता असली तरी धोनीने आजवर अनेक सामने जिंकून दिले आहेत,'' असेही त्याने स्पष्ट केले. 

तसेच भारताची फिरकी जोडी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यासाठी आशिया करंडक आव्हानात्मक असणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. परदेश दौऱ्यात विराट कोहलीची मदार नेहमी फिरकी गोलंदाजीवर राहिली असून कुलदीप आणि चहल दोघांनीही उत्तम कामगिरी केली आहे. ''कुलदीप आणि चहल यांनी मागील काही वर्षात उत्तम कामगिरी केली आहे मात्र आशिया खंडातील फलंदाजांना फिरकी गोलंदाजी खेळण्याचा चांगला अनुभव असतो आणि त्यामुळेच कुलदीप आणि चहल यांचे आव्हान वाढले आहे,'' असे त्याने सांगितले. 

भारताने संयुक्त अरब अमिरातीमध्ये एकही सामना खेळलेला नाही. याउलट भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने अनेक सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळले आहेत. आशिया करंडक स्पर्धेत भारत आपला पहिला सामना 18 सप्टेंबरला हाँग काँगविरुद्ध खेळणार आहे.  

संबंधित बातम्या