भारताचा वेगवान मारा भारीये पण... : पाँटींग

वृत्तसंस्था
Wednesday, 4 December 2019

भारताची वेगवान गोलंदाजी जबरदस्त आहे, परंतु ऑस्ट्रेलियात त्यांचे फिरकी गोलंदाज अपयशी ठरतात परिणामी मायदेशात ऑस्ट्रेलियाची गोलंदाज वरचढ असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. 

मेलबर्न : एरवी प्रतिस्पर्धी संघाचे आणि खेळाडूंचे कौतूक करताना हातचे राखणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने भारताच्या वेगवान माऱ्यावर मात्र स्तूतीसुमनांचा वर्षाव केला आहे. भारताची वेगवान गोलंदाजी जबरदस्त आहे, परंतु ऑस्ट्रेलियात त्यांचे फिरकी गोलंदाज अपयशी ठरतात परिणामी मायदेशात ऑस्ट्रेलियाची गोलंदाज वरचढ असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. 

पृथ्वी शॉचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन

जसप्रित बुमरा आघाडीचा गोलंदाज असलेल्या भारताच्या ताफ्यात महम्मद शमी, इशांत शर्मा अशी भेदक अस्त्रे असल्यामुळे कसोटी क्रमवारीत भारत प्रदीर्घ काळापासून अव्वल स्थानावर आहे. या त्रयीमुळे भारताने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 

जेव्हा आपण प्रत्येक दिवसाचा विचार करतो तेव्हा भारताची वेगवान गोलंदाज तिखट आहे. बुमरा आणि शमी गेल्या दोन वर्षांपासून भेदक मारा करत आहेत यांच्या जोडीला जेव्हा उमेश यादव आणि इशांत शर्मा असतात तेव्हा ते फारच दहशत निर्माण करतात, असे पॉंटिंगने ऑस्ट्रेलियातील एका क्रिकेटविषयक संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. 

IPL 2020 : अभी जोश बाकी है! मॅक्सवेल आयपीएलच्या लिलावात

एकीकडे अशा वेगवान गोलंदाजांना आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांची साथ मिळत असल्यामुळे भारतीय गोलंदाजी परिपूर्ण होत असली तरी हे फिरकी गोलंदाज ऑस्ट्रेलियात प्रभावी ठरत नाही या तुलनेत नॅथन लायनचा ऑस्ट्रेलियाच यशाचा आलेख मोठा आहे, असे पॉंटिंगचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियाने नुकतेच पाकिस्तानचा 2-0 असा पराभव केला आणि जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. पहिला क्रमांक अर्थात भारताचा आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीत विविधता असल्यामुळे त्यांचे एक पाऊल पुढे आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कमुळेही ऑस्ट्रेलियाची ताकद अधिक असल्याचे पॉंटिंगने सांगितले.  


​ ​

संबंधित बातम्या