कुस्ती स्पर्धेत रेश्मा मानेस ब्राँझपदक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

रेश्‍माची पहिलीच कुस्ती हरियानाच्या राधिका हिच्याबरोबर होती. यामध्ये रेश्‍मा ८-३ अशी आघाडीवर होती. पण, शेवटच्या १५ सेकंदांत राधिकाने चार गुणांची कमाई केली व यामुळे लढत ८-८ अशी बरोबरीत राहिली.

जालंधर / कोल्हापूर - महाराष्ट्राच्या रेश्‍मा मानेने चमकदार कामगिरी करीत टाटा मोटर्स वरिष्ठ गट कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात ब्राँझपदकाची कमाई केली. यासोबतच विनेश, साक्षी, अनिता यांनी आपापल्या गटांत चमक दाखवत सुवर्णपदक मिळविले.

रेश्‍माची पहिलीच कुस्ती हरियानाच्या राधिका हिच्याबरोबर होती. यामध्ये रेश्‍मा ८-३ अशी आघाडीवर होती. पण, शेवटच्या १५ सेकंदांत राधिकाने चार गुणांची कमाई केली व यामुळे लढत ८-८ अशी बरोबरीत राहिली. यामुळे रेश्‍माचा निसटता पराभव झाला.

हे कसं शक्य आहे ? वाचा - डोक्‍याने नारळ फोडणारे हे कोल्हापुरी आण्णा...  

फ्रीडम यादवला केले चितपट

रिपॅचस राउंडमध्ये रेश्‍माला हिमाचलच्या सुमन ठाकूरसोबत पुढे चाल मिळाली. यानंतर कांस्यपदक लढतीत तिने उत्तर प्रदेशच्या फ्रीडम यादवला चितपट करून पदक मिळविले. अन्य लढतींमध्ये हरियानाच्या अनिताने रेल्वेच्या दिव्या काकरानला ६८ किलो वजनी गटात पराभूत केले. तिच्या सुवर्ण कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे राष्ट्रकुल ब्राँझपदकविजेत्या दिव्या काकरानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

हेही वाचा - चक्रीवादळाचा धोका ओळखण्यासाठी किनारपट्टीवर हे उपकरण 

 


​ ​

संबंधित बातम्या