चक्क क्रेडिट कार्डने झाला सामन्याचा टॉस

वृत्तसंस्था
Monday, 30 July 2018

संपूर्ण जग डिजीटल बनतंय म्हटल्यावर क्रीडा क्षेत्रही यापासून कसे लांब राहणार. याचाच प्रत्यय आर्सेनलच्या सराव सामन्या दरम्यान आला. आर्सेनल आणि सेंट जर्मेन यांच्यात झालेल्या सराव सामन्यादरम्यान नाणेफेकीच्यावेळी नाण्याऐवजी क्रेडिट कार्डचा वापर करण्यात आला. 

सिंगापूर : संपूर्ण जग डिजीटल बनतंय म्हटल्यावर क्रीडा क्षेत्रही यापासून कसे लांब राहणार. याचाच प्रत्यय आर्सेनलच्या सराव सामन्या दरम्यान आला. आर्सेनल आणि सेंट जर्मेन यांच्यात झालेल्या सराव सामन्यादरम्यान नाणेफेकीच्यावेळी नाण्याऐवजी क्रेडिट कार्डचा वापर करण्यात आला. 

 

असे वागण्यामागेही एक कारण होते. 'युनियन पे इंटरनॅशनल' हे आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स करंडकाचे प्रायोजक असल्याने त्यांनी या संधीचा फायदा घेत त्यांचे क्रेडिट कार्ड वापरण्यास सांगितले. हा कृती सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली.  

तत्पूर्वी सामना सुरु होण्याआधी सामन्याच्या पंचानीच आर्सेनलचा कर्णधार मेसूट ओझिल याची स्वाक्षरी मागितली. त्यानेही सामन्यात वापरण्यात येणाऱ्या पिवळ्या कार्डवर पंचांना स्वाक्षरी दिली.

ओझिलने सामना सुरु झाल्यावर 13 व्या मिनिटालाच गोल केला. आर्सेनलने हा सामना 5-1 असा जिंकला. ओझिलने नुकतीच जर्मनीच्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घोषित केली आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या