...या कारणामुळे भारत ऑस्ट्रेलियात खेळणार नाही ट्वेन्टी-20 मालिका

शैलेश नागवेकर
Thursday, 23 July 2020

या वर्षाअखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून  विराट कोहलीच्या टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन होईल. पण या दौऱ्या अगोदर 14 दिवसांचे विलगीकरण आवश्यक असल्याने ऑस्ट्रेलियाला ट्वेन्टी-20 मालिकेवर पाणी सोडावे लागेल.

सिडनी : या वर्षाअखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून  विराट कोहलीच्या टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन होईल. पण या दौऱ्या अगोदर 14 दिवसांचे विलगीकरण आवश्यक असल्याने ऑस्ट्रेलियाला ट्वेन्टी-20 मालिकेवर पाणी सोडावे लागेल.

बीसीसीआयच्या आर्थिक पाठबळामुळेच हरभजन सिंगची 'त्या' प्रकरणातून सुटका 

ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी ऑक्टोबर महिन्यात भारतीय संघ तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार होता. या रद्द झालेल्या मालिकेचा ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेनंतर समावेश करायचा आहे. सरकारच्या नियमाप्रमाणे भारतीय संघाला 14 दिवसांचे विलगीकरण करावेच लागेल, परंतु त्यामुळे तीन सामन्यांची ट्वेन्टी-20 मालिका खेळवण्यासाठी पुरेसा वेळ नसेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी निक हॉक्ले यांनी सांगितले.

या मालिकेबाबत आमची क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा झालेली आहे, परंतु 14 दिवसांच्या विलगीकरण अटीमुळे शक्य नाही, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षीततेसाठी सर्व नियम काटेकोर पाळणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील मालिकांचाही कार्यक्रमही निश्चित होत असल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेसाठी अतिरिक्त वेळ देता येणे कठीण आहे, असे बीसीसीआयच्या या पदाधिकाऱ्याने सांगितले.

जागतिक विजेत्या सिंधूचा घरातच "सराव' 

ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता आणि इंग्लंडचा संघ भारतात येण्याचा कालावधी यामध्ये फारसे अंतर नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरचा एकदिवसीय सामना 17 जानेवारी रोजी आहे. त्यानंतर दोन दिवसांची विश्रांती आणि त्यानंतर एकेका दिवसाच्या अंतराने तीन ट्वेन्टी-20 सामने खेळायचे म्हटले तरी 24 जानेवारीच्या अगोदर ही मालिका संपणार नाही. त्यानंतर 26 जानेवारीच्या अगोदर भारतीय संघ मायदेशात परणार नाही. मायदेशात विलगीकरणाचा नियम नसला तरी आठवडाभरात लगेच इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू करणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक ठरेल, असे गणित बीसीसीआयच्या या पदाधिकाऱ्याने मांडले.


​ ​

संबंधित बातम्या