रिअल माद्रिद संघाची 'ला लिगा' स्पर्धेच्या खिताबाकडे वाटचाल    

टीम ई-सकाळ
Tuesday, 14 July 2020

स्पॅनिश फुटबॉल लीग 'ला लिगा' स्पर्धेत रिअल माद्रिद आणि ग्रॅनडा यांच्यात झालेल्या सामन्यात रिअल माद्रिद संघाने ग्रॅनडाला 2 - 1 ने नमवत यंदाच्या स्पर्धेतील 25 वा विजय मिळवला आहे.

स्पॅनिश फुटबॉल लीग 'ला लिगा' स्पर्धेत रिअल माद्रिद आणि ग्रॅनडा यांच्यात झालेल्या सामन्यात रिअल माद्रिद संघाने ग्रॅनडाला 2 - 1 ने नमवत यंदाच्या स्पर्धेतील 25 वा विजय मिळवला आहे. त्यामुळे रिअल माद्रिदच्या संघाने यंदाच्या 'ला लिगा' स्पर्धेच्या खिताबाकडे आगेकूच केली आहे. ग्रॅनडावर मिळवलेल्या विजयामुळे रिअल माद्रिद संघाला 3 गुण मिळाले असून, 83 अंकांसह रिअल माद्रिद क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे.        

विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे        

रिअल माद्रिद आणि ग्रॅनडा यांच्यात झालेल्या सामन्यात, रिअल माद्रिदच्या फेरलँड मेंडी ने खेळाच्या सुरवातीच्या 10 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला. तर त्यानंतर 16 व्या मिनिटाला करीम बेन्झेमा ने दुसरा गोल करत, रिअल माद्रिद संघाला आघाडी मिळवून दिली. तर, ग्रॅनडाच्या डार्विन माचीसने 50 व्या मिनिटाला रिअल माद्रिद विरुद्ध एकमेव गोल केला. त्यामुळे रिअल माद्रिद संघाने यंदाच्या हंगामात सलग नववा विजय मिळवलेला आहे. रिअल माद्रिद संघाचा पुढील सामना विल्लारीअल सोबत होणार असून, या सामन्यात रिअल माद्रिद संघाने विजय मिळवल्यास 2017 नंतर रिअल माद्रिदचा संघ पहिला खिताब पटकावणार आहे. यंदाच्या स्पर्धेत रिअल माद्रिदने 36 सामन्यांपैकी 25 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. रिअल माद्रिद संघाचा प्रतिद्वंदी बार्सिलोना संघाने 36 सामन्यांपैकी 24 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.  

ENG vs WI : ऐतिहासिक सामन्यात विंडीजचा इंग्लंडवर विजय  

दरम्यान, रिअल माद्रिदचा संघ 36 सामन्यांमध्ये 83 गुण मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून, बार्सिलोनाने 36 सामन्यात 79 गुण मिळवत दुसरे स्थान राखले आहे. तर एटलेटिको माद्रिदचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून, या संघाने 36 सामन्यांमधील 17 सामन्यात विजय मिळवत 66 गुण मिळवले आहेत. यानंतर सेविलाचा संघ 66 अंकांसह चौथ्या नंबरवर पोहचला असून, सेविला संघाने 36 सामन्यांपैकी 18 सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या