रेयाल माद्रिदची ऐतिहासिक हार

वृत्तसंस्था
Monday, 26 November 2018

ख्रिस्तियानो रोनाल्डोने निरोप घेतल्यापासून रेयाल माद्रिदची कामगिरी खालावतच आहे. त्यांना स्पॅनिश लीग अर्थात ला लिगाच्या इतिहासात प्रथमच एईबारविरुद्ध हार पत्करावी लागली. रेयाल 0-3 असे पराजित झाले. 

माद्रिद : ख्रिस्तियानो रोनाल्डोने निरोप घेतल्यापासून रेयाल माद्रिदची कामगिरी खालावतच आहे. त्यांना स्पॅनिश लीग अर्थात ला लिगाच्या इतिहासात प्रथमच एईबारविरुद्ध हार पत्करावी लागली. रेयाल 0-3 असे पराजित झाले. 

या मोसमात एईबारने केवळ लॉस ब्लॅंकोविरुद्धच दोन गोल केले होते, पण त्यांनी रेयालविरुद्ध त्यापेक्षा सरस कामगिरी केली. सॅंतिएगो सॉलेरी रेयालचे मार्गदर्शक झाल्यापासून संघाची ही पहिली हार आहे. पराभवाबद्दल रेयाल कर्णधार सर्जीओ रामोस याने सहकाऱ्यांना दोषी ठरवले. संघाच्या कामगिरीत जोषच नव्हता. आम्ही प्रतिस्पर्ध्यांना सरस खेळ करण्याची संधी दिली. त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. आमचे मनोधैर्यच खच्ची झाले आहे. त्यातून लवकरच सावरण्याची वेळ आली आहे असे त्याने सांगितले.
 


​ ​

संबंधित बातम्या